शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नागपूर विद्यापीठाची ‘निकाल एक्स्प्रेस’ यंदाही जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:23 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील काही वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्स्प्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे.

ठळक मुद्दे९८ टक्के निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील काही वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्स्प्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे. हिवाळी परीक्षेतील ९८ टक्के निकाल हे तीन दिवसाच्या आत जाहीर झाले असून आता केवळ ९ निकाल लागणे प्रलंबित आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर विद्यापीठात हिवाळी सत्रात ९३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात ४०२, दुसऱ्या टप्प्यात १५९ तर तिसºया टप्प्यात ३७४ परीक्षा होत्या. यापैकी पहिल्या टप्प्यातील ४०१, दुसºया टप्प्यातील १४९ तर तिसºया टप्प्यातील ३६८ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत ९२५ (९८.९३ टक्के) निकाल जाहीर झाले आहेत. यातील ९१८ निकाल हे परीक्षा झाल्यानंतर ३० दिवसांच्या आतच जाहीर झालेत.आॅनस्क्रीन मूल्यांकनामुळे वाढला वेगएकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संथ निकालांमुळे विद्यार्थ्यांचे मोर्चांवर मोर्चे यायचे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल साधारणत: आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत लागायचे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागायचा. २०१४ मध्ये अवघ्या २६ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर झाले होते. २०१५ मध्ये हाच आकडा ३४.५३ टक्के इतका होता. त्यानंतर ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली. त्यानंतर सातत्याने प्रत्येक वर्षी निकालांचा वेग वाढत गेला.२०१६ मध्ये ५०.८३ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले. २०१७ मध्ये ७०.३२ टक्के निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर झाले. २०१८ च्या उन्हाळी परीक्षात तर गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.४३ दिवस तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.२२ दिवसात जाहीर झाले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ