शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ‘एमएसएफ’ची सुरक्षाव्यवस्था काढून घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’वर (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) आहे. मात्र विद्यापीठात आंदोलनादरम्यान होणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळे ही सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात कुलगुरूडॉ. सिद्धार्थविनायक काणे हे लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देकुलगुरूंनी केले सूतोवाच

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’वर (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) आहे. मात्र विद्यापीठात आंदोलनादरम्यान होणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळे ही सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात कुलगुरूडॉ. सिद्धार्थविनायक काणे हे लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मागील आठवड्यात ‘अभाविप’च्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ता मुख्य प्रवेशद्वार तोडून आत शिरले व प्रशासकीय इमारतीत तोडफोड केली. या घटनेनंतर विद्यापीठातील ‘एमएसएफ’च्या अधिकाऱ्यांमार्फत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. काही महिन्यांअगोदर ‘एनएसयूआय’चे तीन डझनांहून अधिक कार्यकर्ते विद्यापीठात शिरले होते व रात्रभर आंदोलन केले होते. ‘एमएसएफ’च्या सुरक्षाव्यवस्थेत वारंवार त्रुटी दिसून येत आहेत. यंदा तर केवळ २० कार्यकर्ते असतानादेखील सुरक्षारक्षक त्यांच्यावर नियंत्रण आणू शकले नाहीत. ही बाब विद्यापीठाने गंभीरतेने घेतली असून, सुरक्षा एजन्सी बदलण्याचा विचार सुरू झाला आहे.विद्यापीठानेच दिले तक्रार करण्याचे आदेशदरम्यान, ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांविरोधात कुलसचिव किंवा उपकुलसचिवांनी पोलीस तक्रार का केली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’ची होती. त्यामुळे घटनेनंतर पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश देण्यात आले होते. आम्ही कुठल्याही राजकीय दबावात नाही व हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे, असे डॉ. काणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर