शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांना परीक्षेचा मोह आवरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 22:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांचा परीक्षा विभागाचा मोह सुटत नाही, असेच काहिसे चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच ते मुख्य प्रशासकीय कार्यालयापेक्षा जास्त वेळ परीक्षा भवनाच घालवित असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देहस्तक्षेप ठरतोय चर्चेचा : प्रशासकीय कार्यालयापेक्षा परीक्षा भवनातच वेळ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांचा परीक्षा विभागाचा मोह सुटत नाही, असेच काहिसे चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच ते मुख्य प्रशासकीय कार्यालयापेक्षा जास्त वेळ परीक्षा भवनाच घालवित असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर विभागाच्या कामकाजातही हस्तक्षेप करीत आहेत. या विभागात त्यांची दिसणारी ही आवड परीक्षा भवनात चर्चेची ठरली आहे.डॉ. खटी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक पदावर होते तेव्हा त्यांचा अधिकाधिक वेळ परीक्षा भवनाऐवजी मुख्य प्रशासकीय कार्यालयात जात असे. विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करायची असली तर त्यांना मुख्य प्रशासकीय कार्यालयात जावे लागत असे. कुलसचिव पदाचा प्रभार मिळाल्यानंतर डॉ. खटी आता परीक्षा भवनात दिसायला लागले आहेत. प्रत्यक्षात प्रभारी कुलसचिवांचा परीक्षा विभागाशी कसलाही संबंध नसतो. परीक्षा विभागाचे कामकाज व निर्णय घेण्याची जबाबदारी परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांवर असते. कुलसचिव पदाकडे फक्त प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी असते. असे असतानाही डॉ. खटी यांचे परीक्षा भवनात नियमितपणे येणे व तेथील कामकाजात हस्तक्षेप करणे समजण्यापलीकडचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते परीक्षा विभागात पीएचडी सेल, गोपनीय शाखा व खाजगी निर्णयात अधिक रुची दाखवित असतात. डॉ. खटी यांची मूळ नियुक्ती विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्थेमध्ये (एलआयटी) आहे. कुलसचिव पदाचा प्रभार मिळाल्यानंतर त्यांनी कधीच एलआयटीत जाण्याची तसदी घेतली नाही. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाचे कुलपती डॉ. सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलपती डॉ. विनायक देशपांडे यांना या संदर्भात कल्पना नाही. यावर डॉ. खटी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला मात्र, होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठRegistrarकुलसचिवexamपरीक्षा