शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ११० विषयांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सरकारी सुटी असूनदेखील २१ नोव्हेंबर रोजी परीक्षा ठेवली आहे. ही बाब समोर आल्यानंतर आता वेळापत्रक बदल करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. या दिवशी होणाऱ्या ११० विषयांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देसरकारी सुटीच्या दिवशी ठेवली परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सरकारी सुटी असूनदेखील २१ नोव्हेंबर रोजी परीक्षा ठेवली आहे. ही बाब समोर आल्यानंतर आता वेळापत्रक बदल करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. या दिवशी होणाऱ्या ११० विषयांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठाच्या तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षा या १३ व १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. तर आठवड्याभरानंतरच चौथ्या टप्प्याच्या परीक्षा सुरू होतील. २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलादनिमित्त सरकारी सुटी आहे. मात्र नागपूर विद्यापीठाने या दिवशी ११० विषयांच्या परीक्षा ठेवल्या आहेत. साधारणत: सरकारी सुटीच्या दिवशी विद्यापीठात परीक्षा ठेवली जात नाही. त्यामुळे जर २१ नोव्हेंबर रोजीच्या परीक्षा पुढे ढकलल्या तर विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.‘कॅलेंडर’ची चुकी असल्याचा दावायासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले आहे. मात्र ही चूक विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेल्या ‘कॅलेंडर’मुळे झाल्याचा दावा केला आहे. या ‘कॅलेंडर’ला बघून वेळापत्रक तयार करण्यात आले व यात २० नोव्हेंबर रोजी सरकारी सुटी दाखविण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सद्यस्थितीत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.नीरज खटी हे सुटीवर आहेत. ते परत आल्यानंतरच ठोस निर्णय होऊ शकणार आहे.२० नोव्हेंबर रोजी होऊ शकते परीक्षादरम्यान, २० नोव्हेंबर रोजी परीक्षा घेतल्या जाऊ शकतात का याबाबतदेखील अधिकाऱ्यांचा विचार सुरू आहे. जर असे झाले तर संंबंधित पेपरसाठी विद्यार्थ्यांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा