शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

नागपूर विद्यापीठ : 'पीएचडी' नोंदणीचे आव्हान एकाच टप्प्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यापीठाने दोन टप्प्यात ‘पेट’ घेणे सुरू केले असून उमेदवारांसमोरील आव्हानदेखील वाढले आहे.

ठळक मुद्देदोन्ही पेपर वस्तुनिष्ठ करण्याचा मानस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यापीठाने दोन टप्प्यात ‘पेट’ घेणे सुरू केले असून उमेदवारांसमोरील आव्हानदेखील वाढले आहे. शिवाय दोन टप्प्यांमध्ये काही दिवसांचे अंतर असल्याने उमेदवारांना प्रतीक्षादेखील करावी लागते. त्यामुळे एकाच टप्प्यात दोन्ही पेपर घेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. शिवाय दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ पद्धतीनेच घेण्याबाबतदेखील विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मागील काही वर्षांपासून ‘पेट-१’ व ‘पेट-२’ अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. ‘पेट-१’मध्ये सामान्य ज्ञान व ‘अ‍ॅप्टिट्यूड’संबंधित प्रश्न असतात तर ‘पेट-२’मध्ये विषयाशी संबंधित प्रश्नांना स्थान असते.‘पेट-२’ मध्ये उमेदवारांना लांबलचक उत्तरे लिहावी लागतात. या परीक्षेची पातळी कठीण असल्याने अनेक उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरले. शिवाय ‘पीएचडी’, ‘एमफिल’, ‘डीलिट’ व ‘डीएस्सी’च्या नियमांसंदर्भात विद्यापीठात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेने डॉ. दिलीप पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. या समितीच्या माध्यमातून काही दिशानिर्देशांत बदल करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार जर नवीन नियम लागू झाले तर याचा फायदा पुढील शैक्षणिक सत्रात ‘पेट’मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना होईल.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाने ‘पेट-१’ व ‘पेट-२’ दोन्ही परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचा मानस केला आहे. शिवाय ‘पेट-२’मधील प्रश्न हे वस्तुनिष्ठ असू शकतील का, याबाबतदेखील विचार सुरू आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. अद्याप काहीही अंतिम झालेले नाही. समिती यावर अभ्यास करीत आहे. मात्र ‘पेट-१’ व ‘पेट-२’ यादरम्यान १५ दिवसांचा कालावधी असतो. त्यामुळे उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे एकाच टप्प्यात दोन्ही परीक्षा होतील का, याबाबत विचार सुरू आहे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ पद्धतीने काढणे शक्य होईल का, याचीदेखील चाचपणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ