शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ५० टक्के विषय काढा, एटीकेटी मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘एटीकेटी’च्या नियमांना सुकर केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन तृतीयांशी विषयांची अट ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘सीबीएस’, ‘सीबीसीएस’चे नवीन नियम जारी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘एटीकेटी’च्या नियमांना सुकर केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन तृतीयांशी विषयांची अट ठेवण्यात आली आहे.मंगळवारी विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात नवीन दिशानिर्देश जारी केलेत. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी व चौथ्या सत्रात प्रवेश मिळविण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र मिळून ५० टक्के विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच चौथ्या सत्राचा परीक्षा अर्जदेखील भरणे आवश्यक आहे. तर सहाव्या सत्रात प्रवेशासाठी त्याला पाचव्या सत्रापर्यंतच्या एकूण विषयांपैकी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय सत्रातील एकूण विषयांपैकी दोन तृतीयांश विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल.विद्यापीठात ‘एटीकेटी’चा नियम अनेक वर्षांपासून आहे. मात्र नियमांत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. काही नियमांनुसार तर चौथ्या सत्रात ‘एटीकेटी’चा फायदा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम सत्रात उत्तीर्ण होणे आवश्यक होते. तर काही नियमांनुसार प्रथम व द्वितीय सत्रात उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्याला चौथ्या सत्रात प्रवेश मिळत होता. एकसारखे नियम नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनासमोर संभ्रम निर्माण व्हायचा. आता सर्व नियम स्पष्ट झाल्याने भविष्यात ‘एटीकेटी’संदर्भात कुठलाही संभ्रम राहणार नाही, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता ही समानता आणण्यात आली आहे. याचा त्यांना खूप फायदा होईल. सोबतच कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे म्हणाले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा