शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : परीक्षांसाठी तयार करावे लागतील नवे पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:10 IST

कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यापीठांची धावपळ होणार आहे. परीक्षेची प्रणाली बदलणार असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नव्याने सर्व पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत.

ठळक मुद्देपरीक्षा केंद्रांची संख्यादेखील वाढवावी लागेल : ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यापीठांची धावपळ होणार आहे. परीक्षेची प्रणाली बदलणार असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नव्याने सर्व पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत. शिवाय परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्यादेखील त्या हिशेबाने वाढवावी लागणार आहे.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठ परीक्षांसंदर्भात शुक्रवारी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्याच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा जुलै महिन्यात घ्यायच्या आहेत तर कुठल्याही परिस्थितीत निकाल १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करायचे आहेत.

उन्हाळी परीक्षांचे सर्व पेपर अगोदरच ‘सेट’ झाले होते. परंतु आता परीक्षा या तीन तासांऐवजी दोन तासांच्या असतील. त्यामुळे साहजिकच नव्याने पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी लागणार आहे. शिवाय एकाच महिन्यात इतक्या साºया परीक्षा घ्यायच्या असल्यामुळे संपूर्ण नियोजन या महिन्यातच तयार करावे लागणार आहे.परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळायचे आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात परीक्षा केंद्र निश्चित करणे अनिवार्य आहे. यादृष्टीने विद्यापीठाकडून सोमवारपासूनच पावले उचलण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

प्राधिकरणांची मंजुरी आवश्यक

राज्य शासनाचे अद्याप लिखित निर्देश आलेले नाहीत. परंतु परीक्षांचा कालावधी तीनऐवजी दोन तासाचा असेल अशी सूचना करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठात असे करण्यासाठी विद्वत्त परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षा मंडळाच्या बैठकीतदेखील परीक्षा प्रणालीबाबत मंजुरी घ्यावी लागेल. जुलै महिन्यात परीक्षा घ्यायच्या असल्याने युध्दपातळीवर ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा