शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचे ‘टार्गेट’ १३ डिसेंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 12:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम १३ डिसेंबर अगोदर पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देतर दिवसाला पाच हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. मागील काही काळापासून बांधकामाने वेग घेतला असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रशासनाने कंत्राटदाराला १३ डिसेंबर अगोदर हे काम पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. जर वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अंतर्गत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंबर २०१५ रोजी याचे भूमिपूजन पार पडले.यावेळी राहुल बजाज यांनी हे काम दोन वर्षांत पूर्ण व्हायला हवे व १ आॅक्टोबरपासून याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होईल असे प्रतिपादन केले होते. तर ही ‘स्मार्ट’ व ‘ग्रीन’ इमारत पेपरलेस असेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.या समारंभानंतर वर्षभर तर येथे काहीच काम झाले नाही. विद्यापीठाने विविध प्रशासकीय अडचणी दूर करुन निविदी प्रक्रिया राबविली होती. यात ३ निविदा आल्या होत्या व सर्व निकष पूर्ण करणाऱ्या नागपूरातील एका कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय झाला. कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरदेखील काम सुरू झाले नव्हते.२०१६ या वर्षाच्या अखेरीस महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी २०१८ चे ‘टार्गेट’ प्रशासनाने ठेवले होते. सद्यस्थितीत या इमारतीचा ढाचा उभा झाला आहे व ‘टाईल्स’ वगैरेदेखील लावण्याचे काम सुरु आहे. विद्युत, ‘प्लंबिंग’ तसेच रंगरंगोटीचे काम १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजे, असे आम्ही कंत्राटदाराला सांगितले असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

कुलगुरू निवासस्थानाशी थेट जोडली जाणार इमारतनवीन प्रशासकीय इमारत ही कुलगुरू निवासस्थानाच्या अगदी जवळ आहे. या इमारतीपासून ते कुलगुरू निवासस्थानापर्यंत सिमेंटचा अंतर्गत मार्ग बनविण्यात येईल. त्यामुळे कुलगुरूंना थेट पायीदेखील कार्यालयात येता येणार आहे, असे डॉ.काणे यांनी सांगितले.

बजाज यांची मुदत केव्हाच संपली१० सप्टेंबर २०१६ पासून या इमारतीच्या बांधकामाचे ‘काऊंटडाऊन’ प्रशासनाने सुरू केले. प्रत्यक्षात २०१५ सालच्या १ आॅक्टोबरपासूनच याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होणार होते. तसे कुलगुरूंनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु प्रशासकीय उदासीनता व विविध अडथळे यांच्यामुळे हे काम वर्षभर उशिराने सुरू झाले होते. दरम्यान या इमारतीच्या कोनशीला समारंभाला जवळपास तीन वर्ष होत आहेत. बजाज यांनी २ वर्षांत इमारत पूर्ण करण्यात यावी, असे सांगितले होते. मात्र त्यांची मुदत कधीच संपली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ