शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : निवडणुकांमुळे परीक्षांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 20:57 IST

लोकसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून मतदानाच्या दिवशीचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देवेळापत्रक बदलणार, ७१ पेपर ‘पोस्टपोन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून मतदानाच्या दिवशीचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान केंद्र म्हणून साधारणत: निवडणूक आयोगाकडून शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्यात येतात. केवळ मतदानाचा दिवसच नाही तर त्याअगोदरचे तीन दिवस व नंतरचे दोन दिवसदेखील तेथे निवडणुकांचे काम सुरू असते. यात मतदानाची तयारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था, सुरक्षाव्यवस्थेची आखणी तसेच मतदानानंतरचे सोपस्कार यांचा समावेश असतो. दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना २७ फेब्रुवारीपासूनच सुरुवात झाली आहे. शिवाय पुढील आठवड्यात पदवीच्या परीक्षांनादेखील सुरुवात होणार आहे. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा नेमक्या ११ एप्रिल रोजीच आल्या आहेत. अद्याप निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्र नेमकी कुठली राहतील याची कुठलीही यादी आलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा विद्यापीठाने वेळापत्रकांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सद्यस्थितीत ७२ पेपर ‘पोस्टपोन’ करण्यात आले आहेत. या पेपर्सचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितले.इतर तारखांचे काय ?विद्यापीठाने ११ एप्रिल रोजीच्या परीक्षा समोर ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मतदान केंद्र हे दोन ते तीन दिवस अगोदरच अधिग्रहित करण्यात येतात. अशा स्थितीत त्या केंद्रांवर अगोदर घोषित वेळापत्रकाप्रमाणे या कालावधीत परीक्षा येत असेल तर मग काय करावे यावर विद्यापीठात मंथन सुरू आहे.निवडणुकांना पूर्ण सहकार्यविद्यापीठाच्या परीक्षा जरी मतदानाच्या कालावधीत येत असल्या तरी निवडणुका होणेदेखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल. सद्यस्थितीत आम्ही ११ एप्रिल रोजीचे पेपर समोर ढकलले आहेत. इतर तारखांबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांना गैरसोय होणार नाही याचीदेखील काळजी घेण्यात येईल असे मत डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९examपरीक्षा