शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : उत्तरपत्रिका घेऊन विद्यार्थिनीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान एक विद्यार्थिनी चक्क परीक्षा केंद्रातील उत्तरपत्रिका घेऊनच गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

ठळक मुद्देशिस्तपालन समितीकडे सोपविले प्रकरण

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान एक विद्यार्थिनी चक्क परीक्षा केंद्रातील उत्तरपत्रिका घेऊनच गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेनंतर केंद्र व परीक्षा विभागात खळबळ उडाली आहे. उत्तर पत्रिका परत मिळविण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी वसंतराव नाईक शासकीय समाजविज्ञान संस्थेत घडली. या केंद्रावर पेपर देण्यासाठी पोहोचलेल्या विद्यार्थिनीने अगोदर संपूर्ण पेपर सोडविला. मात्र वेळ संपल्यानंतर तिने पेपर पर्यवेक्षकांना सोपविलाच नाही. नियमानुसार कक्षाचे पर्यवेक्षक प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जाऊन उत्तरपत्रिका घेतात. त्यानंतर त्यांची मोजणी होते व नंतरच सर्व परीक्षार्थ्यांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येते. मात्र असे असतानादेखील संबंधित विद्यार्थिनी परीक्षा केंद्रातून उत्तरपत्रिका बाहेर कशी घेऊन गेली हा प्रश्न कायम आहे. याचे उत्तर देण्याचे परीक्षा विभाग तसेच परीक्षा केंद्रावरील कर्मचारी टाळत आहेत. या घटनेची माहिती इतरांना होऊ नये यासाठी गुपचूपपणे हे प्रकरण शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात आले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग व परीक्षा केंद्र अधिकाºयांशी संपर्क केला असता दोघांनीही घटनेला दुजोरा दिला. मात्र अधिक माहिती देण्याचे टाळले. आम्ही कुठलीही माहिती देऊ शकत नाही, असे केंद्र अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी घटना झाल्याचे मान्य केले. मात्र सुटीवर असल्याने जास्त माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.परत मिळाली उत्तरपत्रिकादरम्यान घटनेची माहिती मिळताच संबंधित विद्यार्थिनीशी संपर्क करण्यात आला व तिला परीक्षा केंद्रावर परत बोलविण्यात आले. अगोदर तिने उत्तरपत्रिका नेलीच नाही, असा पवित्रा घेतला. मात्र कारवाईचा धाक दाखविताच तिने आपली चूक मान्य केली व उत्तरपत्रिका परत केली.

केंद्र अधिकाऱ्यांचीदेखील चौकशीयाप्रकरणाची चौकशी शिस्तपालन समितीकडून करण्यात येईल, असे डॉ.नीरज खटी यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन होणार नाही. शिस्तपालन समितीच्या निर्णयानंतरच उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करायचे की नाही, हे ठरविण्यात येईल व केंद्र अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीदेखील चौकशी होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ