शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; ‘पीएचडी वायव्हा’ची संपूर्ण प्रक्रियाच ‘ऑनलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:39 IST

‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे २०० हून अधिक संशोधकांच्या शोधप्रबंधाच्या मूल्यांकनाचे अहवाल आले होते. एकूणच स्थिती लक्षात घेता, ‘ऑनलाईन वायव्हा’ घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देविशेष ‘सॉफ्टवेअर’चीदेखील निर्मितीदेशातून कुठूनही होऊ शकणार मूल्यमापन

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘पीएचडी’च्या ‘वायव्हा’ अर्थात मौखिक परीक्षांसंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. मौखिक परीक्षेची संपूर्ण प्रक्रियाच ‘ऑनलाईन’ राहणार आहे. तज्ज्ञांकडून वेळ घेण्यापासून ते त्यांच्याकडून परीक्षेचा अहवाल घेण्यापर्यंतचे संपूर्ण टप्पे ‘ऑनलाईन’ माध्यमातून होणार आहेत. यासाठी विशेष ‘सॉफ्टवेअर’चीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. केवळ ‘कोरोना’चे संकट असेपर्यंतच नव्हे तर पुढेदेखील हा प्रयोग चालू ठेवण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पुढील आठवड्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.‘कोरोना’मुळे विद्यापीठाने ‘वायव्हा’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला व १६ मार्चपासूनचे सर्व ‘वायव्हा’ पुढे ढकलण्यात आले. परंतु विद्यापीठाकडे २०० हून अधिक संशोधकांच्या शोधप्रबंधाच्या मूल्यांकनाचे अहवाल आले होते. एकूणच स्थिती लक्षात घेता, ‘ऑनलाईन वायव्हा’ घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी विद्यापीठाने समितीदेखील गठित केली होती. यासंदर्भातील रूपरेषा जवळपास अंतिम झाली आहे. ‘ऑनलाईन मिटिंग प्लॅटफॉर्म’वर प्रत्यक्ष ‘वायव्हा’ होणार आहे. तज्ज्ञ देशात कुठेही बसून संशोधकांना प्रश्न विचारू शकणार आहेत. शिवाय ‘ओपन डिफेन्स वायव्हा’ असल्याने इतरही लोक त्यात सहभागी होऊ शकणार आहे. उमेदवाराला मात्र संंंबंधित संशोधन केंद्रावरूनच सादरीकरण करावे लागणार आहे. नेमक्या कुठल्या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून ही परीक्षा होईल याचा निर्णय बुधवारी होणार आहे. यासंदर्भात दोन ते तीन कंपन्यांच्या प्रतिनिधींना सादरीकरणासाठी बोलविण्यात आले आहे. दरम्यान, मौखिक परीक्षेसाठी तज्ज्ञांची वेळ घेणे, त्यांना सगळ्या मूल्यांकनकर्त्यांचे अहवाल पाठविणे इत्यादी प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्यासाठी विद्यापीठाने ‘सॉफ्टवेअर’ बनविले आहे. तज्ज्ञांना ‘ई-मेल’वरच ‘सॉफ्टवेअर’ची ‘लिंक’ व ‘पासवर्ड’ जाईल. त्यानंतर ते तेथेच सर्व अहवालदेखील पाहू शकतील. शिवाय परीक्षा झाल्यानंतर त्यांचे अभिप्राय व निर्णयदेखील तातडीने त्याच माध्यमातून कळवू शकणार आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रियेला गती येणार आहे.

पदव्युत्तर परीक्षांसाठीदेखील वापर करणारकेवळ ‘कोरोना’चा काळच नव्हे तर संबंधित ‘सॉफ्टवेअर’ पुढेदेखील वापरण्यात येणार आहे. ज्या तज्ज्ञांना नागपुरात येणे शक्य होणार नाही, त्या प्रकरणात ‘ऑनलाईन वायव्हा’ होतील. शिवाय ‘एमफार्म’, ‘एमटेक’च्या ‘डेझर्टेशन’साठीदेखील याचा वापर करू, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ