शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 20:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुकां​​​​​​​चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून नामनिर्देशनपत्र नोंदणीला सुरुवात झाली असून, २ जुलैपासून निवडणुका होणार आहेत. ५५ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत् परिषदेच्या स्थापनेची प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक कार्यक्रम जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून नामनिर्देशनपत्र नोंदणीला सुरुवात झाली असून, २ जुलैपासून निवडणुका होणार आहेत. ५५ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत् परिषदेच्या स्थापनेची प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे.नागपूर विद्यापीठाने विविध विषयनिहाय निवडणूक वेळापत्रक घोषित केले आहे. नव्या कायद्यानुसार अभ्यास मंडळावर तीन सदस्यांची निवडणुकीने नियुक्ती झाली तर सहा सदस्य हे कुलगुरूंनी नामित केलेले आहेत. त्यातून एक अध्यक्ष निवडण्यात येणार आहे.अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १३ ते २२ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत तर २३ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. २४ जून रोजी उमेदवारांची तात्पुरती यादी प्रकाशित होणार आहे. त्यावर अपील करण्याची २५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून, २८ जूनपर्यंत त्यावर कुलगुरूंना अंतिम निर्णय घ्यायचा आहे तसेच २९ जून रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. ३० जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत दिली आहे. परंतु प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय हे वेळापत्रक वेगळे आहे. प्रत्यक्ष निवडणुका या २ जुलैपासून सुरू होतील व ५ जुलैपर्यंत चालतील.संघटना लागल्या कामालासद्यस्थितीत अभ्यास मंडळांवर नामनिर्देशित झालेल्या सदस्यांमध्ये शिक्षण मंचचे वर्चस्व आहे. अनेक मंडळांवर ‘सेक्युलर पॅनल’ तर काहींवर ‘यंग टीचर्स असोसिएशन’चे तीन-तीन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. प्रत्येक संघटना यासाठी कामाला लागली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठElectionनिवडणूक