शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

नागपूर विद्यापीठातील पदवी प्रवेश ‘ऑनलाईन’ नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:34 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदवीस्तरावरील प्रवेश ‘ऑनलाईन’ करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र प्राधिकरण सदस्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता विद्यापीठाने मागील वर्षीप्रमाणेच प्रवेशपद्धती राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेत चर्चा : विद्यार्थी मदतीसाठी महाविद्यालयांत ‘सीएसआर’ फंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदवीस्तरावरील प्रवेश ‘ऑनलाईन’ करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र प्राधिकरण सदस्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता विद्यापीठाने मागील वर्षीप्रमाणेच प्रवेशपद्धती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ प्रवेशानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी ‘ऑनलाईन’ होईल. गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली व यात प्रशासनातर्फे ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.पदवी प्रवेश ‘ऑनलाईन’ घेण्यासंदर्भात विद्यापीठाने तयारी सुरू केली होती. परंतु यासंदर्भात प्राधिकरण सदस्यांशी चर्चा करण्यात आली नव्हती. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर काही सदस्यांनी आक्षेप घेतला. प्राचार्य फोरमनेदेखील पदवी प्रवेश ‘ऑफलाईन’ करण्याची मागणी केली होती. यावर सदस्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता, पदवी प्रवेश ‘ऑफलाईन’च होतील, हे प्रशासनाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या ‘डाटा’ची नोंदणी ‘ऑनलाईन’ करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. शिवाय ‘ऑनलाईन’ प्रवेशाबाबत अधिष्ठाता मंडळ तसेच विद्वत परिषदेत मंथन होईल, असेदेखील बैठकीत सांगण्यात आले.दरम्यान, बैठकीत विद्यापीठाच्या शैक्षणिक विभाग व महाविद्यालयांमध्ये ‘सीएसआर फंड’ स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येईल.विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीत दैनिक वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन २०० रुपयांपासून ५०० रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय ‘पीएचडी’च्या परीक्षकांचे मानधन १ हजार रुपयांऐवजी २ हजार रुपये करण्याच्या प्रस्तावालादेखील मान्यता देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.विद्यार्थिनींना मिळणार बसभाडे‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थिनींना बसभाडे देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. ‘कमवा व शिकवा’ योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थी कल्याणसंदर्भातील योजनांबाबत विष्णू चांगदे यांच्या अध्यक्षतेत बनविण्यात आलेल्या समितीने प्रस्ताव सादर केला होता.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठonlineऑनलाइन