शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : एकाच बैठकीत तिघांकडून ९९ कप चहांचे सेवन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:38 IST

साधारणत: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध बैठकांमध्ये सदस्यांसाठी चहा, नाश्ता बोलविण्यात येतो. यासाठी विशेष निधी राखीव असतो. मात्र चहा, कॉफीच्या या देयकात मोठे गोलमाल होत असल्याची शंका खुद्द कुलगुरूंनाच आली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठात चहा, कॉफीच्या देयकात गोलमाल?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध बैठकांमध्ये सदस्यांसाठी चहा, नाश्ता बोलविण्यात येतो. यासाठी विशेष निधी राखीव असतो. मात्र चहा, कॉफीच्या या देयकात मोठे गोलमाल होत असल्याची शंका खुद्द कुलगुरूंनाच आली आहे. अभ्यास मंडळाच्या एका बैठकीत केवळ तीन सदस्यांनी ९९ कप चहा व २५ कॉफीचे सेवन केले व तसे देयकच वित्त विभागाकडे आले. विद्यापीठात अशी आणखी प्रकरणे आहेत का व यामागे नेमका दोषी कोण, याचा शोध घेण्यात येणार आहे.नागपूर विद्यापीठाच्या विद्याशाखा विभागात मे महिन्यात अभ्यास मंडळाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या तीन सदस्यांना विद्याशाखेकडून चहा देण्यात आला. चहा, कॉफी, नाश्त्याचा एकूण खर्चच दीड लाख रुपयांच्या घरात दाखविण्यात आला. ही बाब वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्यासमोर आल्यावर त्यांनी तत्काळ डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना याची सूचना दिली. कुलगुरूंनी तत्काळ ही देयके थांबविली असून, संबंधित विभागाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. प्रत्येक विभागाला बैठकांमधील अवांतर खर्चासाठी अग्रीम रक्कम देण्यात येते व त्यातून खर्चाचे देयक सादर करावे लागतात. परंतु संबंधित बैठकीतील खर्च हा फार जास्त प्रमाणात आहे.कुलगुरूदेखील आश्चर्यचकितयासंदर्भात कुलगुरू डॉ.काणे यांना विचारणा केली त्यावेळी त्यांनीदेखील यासंदर्भात आश्चर्य व्यक्त केले. बैठकांमध्ये येणाºया सदस्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते. परंतु केवळ एका बैठकीत तीन सदस्य इतका प्रचंड प्रमाणात चहा-कॉफी पिणे शक्य नाही. यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात येईल व नेमके तथ्य शोधण्यात येईल. कुणी दोषी आढळले तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ