शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : सुरक्षेवरून ‘अ‍ॅप’बाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 01:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने तयार केलेल्या परीक्षा अ‍ॅपवरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करणे धोक्याचे तर ठरणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक माहितीअभावी तसेच अ‍ॅप धोकादायक असल्याच्या अफवेवरुन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपरीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक म्हणतात, अ‍ॅप सुरक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने तयार केलेल्या परीक्षा अ‍ॅपवरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करणे धोक्याचे तर ठरणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक माहितीअभावी तसेच अ‍ॅप धोकादायक असल्याच्या अफवेवरुन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. संबंधित अ‍ॅप सुरक्षित असल्याचा दावा परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केला आहे. विद्यापीठाच्या सर्व्हरमध्ये सर्व डाटा सुरक्षित आहे. त्यामुळे तो लीक होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.आरटीएमएनयू परीक्षा हे मोबाईल अ‍ॅप हे प्लेस्टोअरवर उपलब्ध नसून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एपीके प्रकारात हे देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांना ही फाईल डाऊनलोड करता येऊ शकते. यासंदर्भात नेमक्या काय तांत्रिक बाबींवर भर द्यायचा याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. एपीके प्रकारातील हे अ‍ॅप असल्याने धोक्याची सूचना विद्यार्थ्यांना येते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांनी संभ्रमित होण्याची किंवा घाबरून जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही. याबाबतचा सर्व तपशील विद्यापीठाने माहितीपत्रिकेत दिला आहे. मोबाईल स्क्रीनवर संदेश येत असला तरी हे अ‍ॅप सुरक्षित असल्याचा दावा डॉ.साबळे यांनी केला आहे.

गाईडलाईन पूर्ण वाचाया अ‍ॅपसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवर बोलताना डॉ. साबळे म्हणाले, अ‍ॅप लॉन्च करण्यासोबतच ते डाऊनलोड कसे करावे याची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक सूचना आहेत. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्या वाचायला हव्या. त्यातूनच त्यांना यासंदर्भात तांत्रिक माहिती मिळेल. मात्र अनेक विद्यार्थी या सूचना न वाचताच अ‍ॅप डाऊनलोड करत आहेत. त्यामुळे संभ्रम वाढतो आहे, असे त्यांनी सांगितले.सर्व्हरवरील ताण वाढलाविद्यापीठाच्या परीक्षा अ‍ॅपची गती फार कमी असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. अ‍ॅप योग्यपणे काम करत नसल्याच्याही तक्रारी आहेत. यावर प्रतिक्रिया देताना डॉ. साबळे म्हणाले, विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व सेमिस्टरच्या परीक्षेला ७० हजार विद्यार्थी आहेत. परंतु अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या मात्र ३ लाखावर आहे. यामुळे सर्व्हरवरील लोड वाढल्याने वेगही मंदावला आहे. मात्र यामुळे परीक्षेदरम्यान काहीही समस्या निर्माण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा