शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : वाचन प्रेरणा दिनाकडे महाविद्यालयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 20:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. सोमवारी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण्याच्या अक्षताच दाखविल्या. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करणे तर सोडाच विद्यार्थ्यांना माहिती देण्याची तसदीदेखील घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात अगोदरच विद्यार्थी वाचनापासून दुरावत आहेत. अशास्थितीत महाविद्यालयांच्या अशा धोरणामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देबहुतांश ठिकाणी निरुत्साह, अनेक ठिकाणी केवळ औपचारिकता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. सोमवारी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण्याच्या अक्षताच दाखविल्या. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करणे तर सोडाच विद्यार्थ्यांना माहिती देण्याची तसदीदेखील घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात अगोदरच विद्यार्थी वाचनापासून दुरावत आहेत. अशास्थितीत महाविद्यालयांच्या अशा धोरणामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.१५ आॅक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळावी व त्यांच्यात वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. यासंदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनुसार नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र पाठवून कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत कळविले होते. वाचनाच्या अनुषंगाने व्याख्याने, चर्चासत्रे, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र बहुतांश महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केले. यंदा तर महाविद्यालयांकडे उपक्रम राबविण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होता. परंतु महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचादेखील निरुत्साह दिसून आला. काही महाविद्यालयांनी उपक्रमांचे आयोजन केले. मात्र बहुतांश ठिकाणी तर याचा विसरच पडल्याचे चित्र होते. काही महाविद्यालयांत तर वाचनालयांमध्ये केवळ फोटो काढण्यापुरते विद्यार्थी एकत्रित करण्यात आले व औपचारिकता पाळण्यात आली. अनेक ठिकाणी तर याबाबत सूचना फलकावर साधी सूचना लावण्याचीदेखील तसदी घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.ग्रंथालयात आयोजन, विभागांमध्ये उदासीनतानागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्येदेखील वाचन प्रेरणा दिनाबाबत उदासीनताच दिसून आली. विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मधील ग्रंथालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व याला विद्यापीठाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. मात्र काही पदव्युत्तर विभाग सोडले तर इतर ठिकाणी वाचनाच्या नावाने बोंबच होती. अनेक ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षेअगोदरचे ‘सबमिशन’ सुरू आहेत. त्याच्या चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत असताना वाचनाची प्रेरणा मात्र कुठेतरी हरवून गेली. विद्यापीठात दिव्याखालीच अंधार असल्याचे दुर्दैवी चित्र होते.महाविद्यालयांनी पुढाकार घेणे अपेक्षितआम्ही महाविद्यालयांना पत्राच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिवसाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत कळविले होते. खरे तर वाचनसंस्कृती वाढविली गेली पाहिजे. यात महाविद्यालयांकडून पुढाकार घेणे अपेक्षित आहे. नेमक्या किती महाविद्यालयांनी कार्यक्रमाचे आयोजन केले हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल, असे कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलाम