शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : परीक्षा भवनातील कॉफी ‘कडू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातील गडबड व गोंधळ नेहमीच समोर येत असतात. मात्र आता परीक्षा भवनाच्या परिसरातील उपाहारगृहामध्ये सुरू असलेला मनमर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या उपाहारगृहातील नियोजित दरपत्रकात विनापरवानगी बदल करण्यात आला असून खाद्यपदार्थ जास्त दराने विकण्यात येत आहेत. विशेषत: येथील कॉफीचे दर तर कुठलीही सूचना न देता ८० टक्क्यांनी वाढविण्यात आले व तसे देयकदेखील विद्यापीठाला पाठविण्यात आले. यासंदर्भात ‘एनएसयूआय’ने प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्यासमोर मांडला आहे.

ठळक मुद्देउपाहारगृहात मनमर्जी दर, नियोजित दरपत्रकात विनापरवानगी बदल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातील गडबड व गोंधळ नेहमीच समोर येत असतात. मात्र आता परीक्षा भवनाच्या परिसरातील उपाहारगृहामध्ये सुरू असलेला मनमर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या उपाहारगृहातील नियोजित दरपत्रकात विनापरवानगी बदल करण्यात आला असून खाद्यपदार्थ जास्त दराने विकण्यात येत आहेत. विशेषत: येथील कॉफीचे दर तर कुठलीही सूचना न देता ८० टक्क्यांनी वाढविण्यात आले व तसे देयकदेखील विद्यापीठाला पाठविण्यात आले. यासंदर्भात ‘एनएसयूआय’ने प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्यासमोर मांडला आहे.नागपूर विद्यापीठाने हे उपाहारगृह चालविण्याचे कंत्राट दिलेले आहे. या उपाहारगृहातील खाद्यपदार्थ तसेच चहा-कॉफी यांचे दर निश्चित करून देण्यात आले आहेत. परीक्षा विभागाचे कर्मचारी-अधिकारी येथूनच चहा-नाश्ता मागवितात. या उपाहारगृहात कॉफीचे दर १० रुपये इतके होते. २० डिसेंबर २०१८ पर्यंत हेच दर होते. गोपनीय विभागाच्या सहायक कुलसचिवांच्या नावे काढलेल्या देयकामध्ये तसा स्पष्ट उल्लेखदेखील आहे. मात्र २७ मार्च २०१९ मधील देयकात कॉफीचे दर १८ रुपये लावण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे उपाहारगृहाच्या ‘मेन्यू’मध्ये कॉफीचे दर १० रुपये इतकेच नमूद आहेत. सोबतच समोसा, कचोरीसह इतर खाद्यपदार्थांचे दरदेखील वाढविण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब का आली नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.उपाहारगृहातील हा प्रकार बेकायदेशीर असून त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ‘एनएसयूआय’ने केली आहे. यासंदर्भात संघटनेतर्फे विरोध प्रदर्शन करण्यात आले. तसेच प्र-कुलगुरूंना निवेदनदेखील सादर करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव अजित सिंह, राष्ट्रीय प्रतिनिधी आमिर नुरी, जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांच्यासह शादाब सोफी, प्रतीक कोल्हे, प्रणय ठाकूर, फरमान अली, प्रज्योत पंखिडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ