शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाचे दार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:56 IST

देशाच्या विविध मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘एनरोलमेंट’ नंबर देणे बंद झाल्याने प्रवेशासाठी लागणारे स्थलांतरण प्रमाणपत्र व ‘ट्रान्सफर सर्टिफिकेट’ (टीसी) मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दार तूर्तास तरी बंद आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात : टीसी व स्थलांतरण प्रमाणपत्राचे दिले जात आहे कारण

आॅनलाईन लोकमतनागपूर : देशाच्या विविध मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘एनरोलमेंट’ नंबर देणे बंद झाल्याने प्रवेशासाठी लागणारे स्थलांतरण प्रमाणपत्र व ‘ट्रान्सफर सर्टिफिकेट’ (टीसी) मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दार तूर्तास तरी बंद आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी ‘डिस्टेंस एज्युकेशन’च्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करीत असल्याने मुक्त विद्यापीठ हे दोन्ही प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देत नाही.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीच्या आधारे परीक्षा विभागाच्या या अघोषित नियमांमुळे नागपूर विद्यापीठाचा शैक्षणिक विभाग व संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश अधांतरीत आहेत. यातच ‘एनरोलमेंट’ नंबर मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाची खात्री नाही. यामुळे विद्यार्थी वर्गात बसू शकत नाही आणि परीक्षाही देऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांचे दाखले व शुल्काचे पैसे कॉलेज आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात फसले आहेत. ‘एनरोलमेंट’ नंबर नसल्याने विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून परीक्षा विभागापासून ते शैक्षणिक विभाग व महाविद्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. परंतु परीक्षा विभागाने या निवेदनलाच कचरापेटी दाखविली. विद्यार्थ्यांच्या या समस्येचे निराकरण करण्यापेक्षा परीक्षा विभाग मौन धारण करून आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या संदर्भात परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी म्हणाले, या संदर्भातील एकही प्रकरण आले नाही. शनिवारी या संबंधित विभागाला याची माहिती विचारण्यात येईल.अधिकाऱ्यांना नियमांची माहिती नाहीविद्यापीठ परीक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यां मध्ये परीक्षा व ‘एनरोलमेंट’ नंबरशी जुळलेल्या नियमांच्या माहितीचा अभाव आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ही समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे. सूत्रानुसार, मुक्त विद्यापीठाकडून नागपूर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात राज्य सरकारचे दिशानिर्देश आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर