शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नागपूर विद्यापीठाचा ९६ वा वर्धापन दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 11:43 IST

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अत्यंत प्रभावी असून त्यामुळे देशात शैक्षणिक क्रांती घडून येईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. तसेच, या बदलामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

ठळक मुद्देविविध पुरस्कारांचे वितरणराष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शैक्षणिक क्रांती होईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अत्यंत प्रभावी असून त्यामुळे देशात शैक्षणिक क्रांती घडून येईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. तसेच, या बदलामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९६ व्या वर्धापन दिवस कार्यक्रमात बोलत होते.हा कार्यक्रम रविवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी व सत्कारमूर्ती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षण गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग सतत प्रयत्न करीत आहे. देशातील शिक्षण पद्धती विद्यार्थीभिमुख झाली पाहिजे. विद्यार्थ्याची आवड ओळखून त्यानुसार कृती करावी लागेल. सर्वांनी योगदान दिले तरच हे शक्य होईल. विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अकॅडेमिक क्रेडिट बँक ही संकल्पना लवकरच लागू केली जाणार आहे. तसेच, शिक्षकांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल. शिक्षण सुधारण्यासाठी याशिवायही विविध योजना येत्या काळात अमलात आणल्या जातील. संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल असे पटवर्धन यांनी बोलताना सांगितले.डॉ. काणे यांनी विद्यापीठ उंच भरारी घेतच राहील असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थी केवळ शिक्षणामुळे घडत नसून त्यांना अंतर्बाह्य संस्कारित करण्याची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे असे सांगितले.

रामभाऊ इंगोले यांना जीवन साधना पुरस्कारयाप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले यांना यावर्षीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर बोलताना इंगोले यांनी नागपूर विद्यापीठाकडून कौतुकाची थाप मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. शिक्षकांच्या भीतीमुळे जास्त शिकू शकलो नाही याची खंत वाटते. परंतु, आज केवळ सामाजिक कार्यामुळे उच्चविद्याविभूषित व्यक्तींसोबत बसण्याची संधी मिळाली अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. इंगोले हे देहव्यापारातील महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करण्याचे महान कार्य करीत आहेत. त्यांनी अनेक मुलांना शिकवून स्वावलंबी केले आहे. त्यांनी समाजापुढे नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ