शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:01 IST

मागील अनेक वर्षांपासून कुठलाही प्रकारे विद्यापीठाच्या पत्रव्यवहारांना उत्तर न देणाऱ्या ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील अनेक वर्षांपासून कुठलाही प्रकारे विद्यापीठाच्या पत्रव्यवहारांना उत्तर न देणाऱ्या ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत याबाबत मंगळवारी ़निर्णय घेण्यात आला. पुढील पावले उचलण्यासाठी विद्वत् परिषदेला शिफारस करण्यात आली असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.जून महिन्यात नागपूर विद्यापीठाने २५६ महाविद्यालयांतील प्रथम वर्ष प्रवेशांवर बंदी लावली होती. यातील ९८ महाविद्यालयांची संलग्नताच रद्द करण्याचा प्रस्ताव होता. यातील अनेक महाविद्यालयांनी मागील ७ ते ८ वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्जच केला नव्हता. यासंदर्भात महाविद्यालयांना पत्रदेखील पाठविण्यात आले होते. यानंतर ११ महाविद्यालयांनी संलग्नीकरण नूतनीकरणासाठी अर्ज केला. दोन महाविद्यालये बंद करण्याबाबत प्रस्ताव आला. एका महाविद्यालयाने न्यायालयात धाव घेतली. ५८ महाविद्यालयांनी ७ ते ८ वर्षांपासून संपर्कच केला नाही तर उर्वरित महाविद्यालयांनी मागील दोन वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेला नाही. या महाविद्यालयांना परत नोटीस पाठविण्यात आली आहे. ५८ महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यासंदर्भात अधिष्ठाता मंडळाने निर्णय घेतला. याबाबतचा प्रस्ताव विद्वत् परिषदेला पाठविण्याची शिफारस करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला. यानुसार या महाविद्यालयांची संलग्नता निश्चित रद्द होणार असल्याचे डॉ.येवले यांनी सांगितले.समाजकार्य महाविद्यालयाला स्वायत्तता मिळणार ?दरम्यान, अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाला स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावावरदेखील चर्चा करण्यात आली. याबाबत दीर्घकाळ चर्चा चालली व अखेर महाविद्यालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. समोरील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव विद्वत् परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. सोबतच या बैठकीत दोन नवीन संशोधन केंद्रांनादेखील मान्यतेच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ