शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : शुल्कासाठी परीक्षा अर्ज अडवले तर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 23:26 IST

Nagpur University warnned कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, अनेकांनी महाविद्यालयांचे पूर्ण शैक्षणिक शुल्क भरलेले नाही. विद्यार्थ्यांची स्थिती समजून न घेता काही महाविद्यालये महाविद्यालय शुल्कासाठी त्यांची अडवणूक करीत आहेत. शुल्क भरल्यावरच परीक्षा अर्ज भरण्यात येईल, असे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. थकीत शुल्कासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. असे करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दिला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, अनेकांनी महाविद्यालयांचे पूर्ण शैक्षणिक शुल्क भरलेले नाही. विद्यार्थ्यांची स्थिती समजून न घेता काही महाविद्यालये महाविद्यालय शुल्कासाठी त्यांची अडवणूक करीत आहेत. शुल्क भरल्यावरच परीक्षा अर्ज भरण्यात येईल, असे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. थकीत शुल्कासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. असे करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दिला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र, अशा काळातही काही महाविद्यालये ही परीक्षा शुल्काच्या आड विद्यार्थ्यांकडून इतर शुल्कही जमा करीत आहेत. मार्च २०२० पासून महाविद्यालय बंद असल्याने ग्रंथालय, संगणक, आदी गोष्टींचा विद्यार्थ्यांनी वापरही केलेला नाही. तरीदेखील महाविद्यालयांकडून त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येत आहे. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज काही महाविद्यालयांकडून अडविण्यात येत आहेत. यासंदर्भात सिनेट सदस्यांनी प्र-कुलगुरूंकडे तक्रारदेखील केली होती.

विद्यापीठाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. गुरुवारी या संदर्भात आदेश जारी करण्यात आले. महाविद्यालयांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क व शिक्षण शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा द्यावी. तसेच परीक्षेचे अर्ज करण्यास विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये अशा सूचना दिल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडे थकीत असलेल्या प्रवेश व शैक्षणिक शुल्काकरिता सहानुभूतिपूर्वक विचार करावा. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडे थकीत असलेले शुल्क तीन ते चार हप्त्यांत भरण्याची सवलत देण्यात यावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी प्राचार्य, विभागप्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा