शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपूर विद्यापीठ : ऑफलाईन’ परीक्षेसाठी ९० टक्केतयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 22:57 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हालचाली वाढल्या आहेत. उन्हाळ्यातच नागपूर विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ परीक्षांसाठी तयारी करून ठेवली होती. सुमारे ७५ हजार परीक्षार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सहभागी होतील.

ठळक मुद्दे शासनाच्या दिशानिर्देशांची प्रतीक्षा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हालचाली वाढल्या आहेत. उन्हाळ्यातच नागपूर विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ परीक्षांसाठी तयारी करून ठेवली होती. सुमारे ७५ हजार परीक्षार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सहभागी होतील. या परीक्षांसाठी ९० टक्के तयारी पूर्ण झाली असून राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची प्रतीक्षा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उन्हाळी परीक्षांची तयारी मार्च महिन्यातच झाली होती. काही पेपरचे ‘मॉडरेशन’ बाकी होते. मात्र ती प्रक्रियादेखील ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत झाली. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार आहेत. आता केवळ वेळापत्रक तयार करणे व परीक्षा केंद्रांची नावे निश्चित करणे ही प्रक्रिया बाकी आहे. ही प्रक्रिया राज्य शासनाचे निश्चित दिशानिर्देश आल्यानंतरच होऊ शकणार आहे.यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना संपर्क केला असता त्यांनी आमची तयारी पूर्ण असल्याचे सांगितले. केवळ काही प्रक्रिया बाकी असून त्या राज्य शासनाच्या निर्देशानंतरच पूर्ण करण्यात येतील,असे त्यांनी स्पष्ट केले.‘ऑनलाईन’ परीक्षा झाल्यास अडचण‘कोरोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने जर ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, तर मात्र विद्यापीठाची अडचण होऊ शकते. ‘ऑनलाईन’ परीक्षांची ‘स्कीम’ तसेच प्रश्नपत्रिका निश्चित करायला दीड महिन्यांचा कालावधी लागू शकेल. शिवाय परीक्षा आयोजित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचादेखील अभाव आहे. ग्रामीण भागात तर परीक्षा केंद्र शोधतानादेखील अडचण होणार आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ