शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नागपूर विद्यापीठ : प्राध्यापकांची ४४ टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढला आहे. प्रत्येक प्राध्यापकावर दोन जणांच्या कामाचे ओझे आहे. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही. सद्यस्थितीत विद्यापीठातील ४४ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. अशा स्थितीत ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क) पहिल्या शंभरात स्थान कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देकसे मिळणार पहिल्या शंभरात ‘रॅकिंग’ ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढला आहे. प्रत्येक प्राध्यापकावर दोन जणांच्या कामाचे ओझे आहे. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही. सद्यस्थितीत विद्यापीठातील ४४ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. अशा स्थितीत ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क) पहिल्या शंभरात स्थान कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची पदभरती झालेली नाही. दुसरीकडे दरवर्षी विविध विभागांतील प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील गुणोत्तर असंतुलित झाले आहे. याचा फटका विभागांमधील शैक्षणिक व संशोधन कार्याला बसतो आहे. नागपूर विद्यापीठात ३३४ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४४ टक्के म्हणजे १४८ पदे रिक्त आहेत. केवळ १८५ प्राध्यापक कार्यरत आहेत.यात २४ ‘प्रोफेसर’, ४२ सहयोगी प्राध्यापक व ११९ सहायक प्राध्यापकांचा समावेश आहे.शासनाचे घोडे अडले कुठे ?राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सर्व कुलगुरूंची बैठक घेतली होती. तेव्हा राज्यातील काही विद्यापीठांमधील रिक्त पदांवर भरतीला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतर राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी विद्यापीठाला आता कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.पुण्यात ६८६ प्राध्यापक कार्यरतनागपूर विद्यापीठ माघारलेले का असा प्रश्न शासकीय पातळीवरून अनेकदा उपस्थित करण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठात अवघे १८५ प्राध्यापक कार्यरत आहेत. दुसरीकडे पुणे विद्यापीठात हीच संख्या ६८६ इतकी आहे. अशा स्थितीत पुणे विद्यापीठाशी स्पर्धा कशी होऊ शकेल, असा प्रश्न काही विभागप्रमुखांनी उपस्थित केला.राज्याकडे मागणी का नाही ?नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदेदेखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. गोंडवाना विद्यापीठात पदभरतीसाठी शासनाने विशेष परवानगी दिली. नागपूर विद्यापीठानेदेखील यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा व राज्याकडे भरतीसाठी विशेष परवानगी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने यासाठी पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कंत्राटी पदभरतीवरून व्यवस्थापन परिषद तापलीदरम्यान, नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागात ९२ कंत्राटी प्राध्यापकांची पदभरती करण्यात येणार आहे. या पदभरतीसंदर्भात गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. नितीन कोंगरे व आर.जी.भोयर यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या व नियमानुसार पदभरती होत नसल्याचे म्हटले. मात्र विद्यापीठ सार्वजनिक अधिनियमातील तरतुदींनुसारच पदभरती होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ही पदभरती होणारच असल्याचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठProfessorप्राध्यापक