शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ :  १२९ परीक्षा परत ‘पोस्टपोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:26 IST

१०५ व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या १२९ परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या व २४ मार्च रोजी होणारे सर्व पेपर आता ८ एप्रिल रोजी नियोजित करण्यात आले. परंतु ८ एप्रिल रोजी नेमकी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’ आयोजित करण्यात आली असल्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा परत पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक जारी केले असून ९, १०,११,१३ व १५ एप्रिल रोजी संबंधित पेपर होणार आहेत.

ठळक मुद्दे८ एप्रिलऐवजी आता ९,१०,११,१३ व १५ एप्रिल रोजी पेपर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १०५ व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या १२९ परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या व २४ मार्च रोजी होणारे सर्व पेपर आता ८ एप्रिल रोजी नियोजित करण्यात आले. परंतु ८ एप्रिल रोजी नेमकी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’ आयोजित करण्यात आली असल्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा परत पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक जारी केले असून ९, १०,११,१३ व १५ एप्रिल रोजी संबंधित पेपर होणार आहेत.‘जेईई-मेन्स’च्या ‘आॅफलाईन’ परीक्षेसाठी नागपुरात परीक्षा केंद्र असतात. या परीक्षेला मोठ्या प्रमाणात नागपूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थी समाविष्ट असतात. सोबतच मध्य प्रदेश व छत्तीसगड येथूनदेखील विद्यार्थी येथे परीक्षा देण्यासाठी येतात. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या जास्त असते. त्यामुळेच ‘सीबीएसई’तर्फे संलग्नित शाळांसोबतच अनेक महाविद्यालयांतदेखील ही परीक्षा घेण्यात येते व परीक्षा केंद्र अगोदरपासूनच निर्धारित करण्यात येतात. यात विद्यापीठाच्या काही परीक्षा केंद्रांचादेखील समावेश आहे. त्यामुळे विद्यापीठाने ८ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा दुसºया अन्य तारखेला घेण्याचा निर्णय घेतला. ७३ विषयांच्या परीक्षा या ९ एप्रिल रोजी होणार आहेत तर २८ विषयांच्या परीक्षा १५ एप्रिल रोजी होणार आहेत. विद्यार्थ्यांची मागणी आणि परीक्षा केंद्रांवरील स्थिती लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा