शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 07:00 IST

corona Nagpur News नागपूर जिल्ह्यात ९ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच ३७४ रुग्णाची नोंद झाली, तर २२ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ९०६७५ झाली असून मृतांची संख्या २९७४ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे९ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच कमी नोंद : ३७४ पॉझिटिव्ह तर ७१६ बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची साथ नियंत्रणात येत असून रुग्णांचा आकडाही कमी व्हायला लागला आहे. नागपूर जिल्ह्यात ९ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच ३७४ रुग्णाची नोंद झाली, तर २२ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ९०६७५ झाली असून मृतांची संख्या २९७४ वर पोहचली आहे. आज नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण, ७१६ बरे झाले. हे प्रमाण ८९.७३ टक्क्यांवर गेले आहे.कोरोनाचा वेग मंदावतचा लोकांमध्ये बेफिकरी आली आहे. मास्क, फिजिकल डिस्टंसिंग व सॅनिटायझेशनचा वापर कमी झाला आहे. तज्ज्ञाच्या मते, कोरोना व्हायरस अजून देशातून हद्दपार झाला नाहीये. तो तितकाच धोकादायक आणि जीवघेणा आहे. यामुळे या काळात अधिक सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. आज ३१०१ आरटीपीसीआर तर २१७३ रॅपीड अँटिजन असे एकूण ५२७४ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात अँटिजन चाचणीतून १४१ व आरटीपीसीआर चाचणीतून २३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.शहरात ११ तर ग्रामीणमध्ये ४ मृत्यूशहरात आज ११, ग्रामीणमध्ये ४ तर जिल्हाबाहेरील ७ रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात आतापर्यंत २०६७, ग्रामीणमध्ये ५२३ तर जिल्हाबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३५७ आहे. नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील २४२, ग्रामीणमधील १२५ तर जिल्हाबाहेरील ७ रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत एकूण ७०६९६, ग्रामीणमध्ये १९४४० तर जिल्हा बाहेरील ५३९ रुग्णांचा समावेश आहे.मेडिकलमध्ये ४१७ संशयितांमधून ४ बाधितमेडिकलच्या प्रयोशाळेत तपासण्यात आलेल्या ४१७ चाचण्यांमधून केवळ ४ रुग्ण बाधित असल्याचे निदान आले. या शिवाय, मेयोमध्ये ६६८ चाचण्यांमधून ४१, एम्समध्ये २४२ चाचण्यांमधून २०, माफसूमध्ये ९६ चाचण्यांमधून ३०, नीरीमध्ये ४१ चाचण्यांमधून सर्वच रुग्ण तर खासगी लॅबमध्ये१६३९ चाचण्यांमधून ९७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्हात आतापर्यंत ५६११८७ रुग्णांच्या चाचण्या झाल्या.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या