शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पायली फटक्यांकडे ग्राहकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:07 IST

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत.

ठळक मुद्देछोट्या आकारातील फटाक्यांना मुलांची पसंती : कानठळ्या बसविणारे फटाके पडले मागे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत.दिवाळी हा प्रकाशाचा सण. तो मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. दुकानात बच्चे कंपनीबरोबर पालकांचीही गर्दी वाढली आहे. लवंगी, भूईचक्र, अनार, रोल व फुलझड्यांशिवाय एकतरी ‘फॅन्सी’ फटाका घेऊन जाण्याचा आग्रह लहान मुले धरताना दिसून येत आहे. ‘पायली’च्या नावाने ओळखले जाणारे ‘फॅन्सी’ फटाके सध्या बाजारात १ इंचापासून ते ४ इंचाच्या पायलीपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. आकाशाता विविध रंगांची उधळण करणाºया या फटाक्याची किंमत ५० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत आहे. यासोबतच ‘सेव्हन शॉट ते ‘वन थाऊझंड शॉट’ फटाका उपलब्ध आहे. याच्या किंमती १०० ते ७ हजार रुपयापर्यंत आहे. यात एकशेवीस शॉट असलेल्या ‘मस्का चस्का’ फटाक्याल्याही यावर्षी चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.चायना फटाक्यांमध्ये यावर्षी ‘गोल्डन येलो’ या फटाक्यात व्हिसलिंग करत पिवळ्या रंगात जळणारे अनार व ‘स्काय एंगल टू इन वन’ यात वेगवेगळ्या रंगात जळणारे अनार, त्याचवेळी आकाशात दुसऱ्या रंगाची उधळण करते. ‘चायना बॉन्टी क्रकलिंग’ हा फटाका विविध आवाज करीत आकाशात झेपावतो. ‘बुलेट ट्रेन’ यात मध्यम आकाराची पायली असून एकाच वेळी बुलेट ट्रेनसारखा आवाज करीत १०० शॉट निघतात. ‘एरियल मल्टी एवनलाँच’ यात एकापाठोपाठ २४० शॉट आकाशात विविध रंगांची उधळण करतात.‘मायाजाल’ ‘चटाचट ज्युरासिक पार्क’ व ‘गील्टरिंग’ हे फटाके विविध आवाज करीत जमिनीवर फुटतात. हे सर्व फटाके १५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. रॉकेटमध्ये ‘मिसाईल रॉकेट’ हे यावर्षी लाल आणि हिरव्या रंगात आले आहे. सुतळी, लक्ष्मी बॉम्बच्या मागणीत घट झाली असल्याचे फटाका विक्रेत्याचे म्हणणे आहे. चायना व आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांच्या मागणीत वाढ झाली असली तरी लवंगी, भूईचक्र, अनार, टिकल्या व फुलझड्यांशिवाय दिवाळीचा आनंदच साजरा होत नसल्याने हे फटाकेही आवडीने घेत असल्याचेही चित्र आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीCrackersफटाके