शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने २२ लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 10:55 IST

सिंगापूरच्या सफरीसाठी निघालेल्या २६ जणांना विमानाच्या बनावट तिकिटा देऊन त्यांची तसेच त्यांच्या सफरीसाठी पुढाकार घेणाऱ्या आयोजकांची टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देविमानाच्या बनावट तिकिटा दिल्या विदेश सफरीसाठी पुढाकार घेणारा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिंगापूरच्या सफरीसाठी निघालेल्या २६ जणांना विमानाच्या बनावट तिकिटा देऊन त्यांची तसेच त्यांच्या सफरीसाठी पुढाकार घेणाऱ्या आयोजकांची टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी एका दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.स्वप्निल अनिल खाडे (वय ३१, रा. बालाजीनगर) हे विदेशी सफरीच्या आयोजनाची सेवा देतात. आरोपी रमेश सर्वरी राजम (रा. माधव व्हिला, नरेंद्रनगर) आणि गौरी रमेश राजम यांच्याशी व्यावसायिक संबंधाने वर्षभरापूर्वी खाडे जुळले. राजम दाम्पत्याचे बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनी चौक, एलआयसी कॉलनीतील साई मेन्शनजवळ कार्यालय आहे. जुलै २०१९ मध्ये हरिओम मित्तल यांनी राजम दाम्पत्याला पॅकेज टूर्सकरिता ३ लाख ५७ हजार रुपये दिले. मात्र, त्यांनी ती सफर घडवून आणली नाही. त्यानंतर स्वप्निल खाडे यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये २६ लोकांच्या विमानाच्या तिकिटांकरिता राजम दाम्पत्याच्या खात्यात २ लाख ६७ हजार रुपये जमा केले. आरोपींनी खाडेंना त्या २६ जणांच्या विमानाच्या तिकिटा पाठविल्या. मात्र, त्या विमान प्रवासाच्या तिकिटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ज्यांच्या या तिकिटा होत्या, त्या मंडळींनी खाडे यांना खरे-खोटे सुनावत आपली रक्कम परत मागितली. त्यानंतर खाडे यांनी पुणे येथील अकबर आॅनलाईन बुकिंग कंपनीचा व्यवस्थापक अनिल कुटे याच्यामार्फत ११ लोकांच्या सिंगापूर सफरीचे आयोजन केले. येथेही आरोपी राजम दाम्पत्याने कुटेंसोबत संगनमत करून ११ लोकांचे पासपोर्ट अडवून (गहाण) ठेवले. या एकूणच प्रकारामुळे खाडे यांचे २२ लाख २८ हजारांनी नुकसान झाले. त्यांनी राजम दाम्पत्य आणि कुटेंना त्यासंबंधाने वारंवार विनंती करून आपली रक्कम परत मागितली. मात्र, आरोपींनी रक्कम परत दिली नाही. त्यामुळे अखेर खाडे यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून बुधवारी आरोपी राजम दाम्पत्य तसेच कुटे या तिघांविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी