शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात परंपरा डावलून मुलींनीच केले वडिलांवर अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:40 IST

आजच्या काळात मुली अनेक ठिकाणी ही परंपरा मोडताना दिसत आहेत आणि असाच एक प्रसंग बुधवारी नागपुरातील गंगाबाई घाटावर सर्वांनी अनुभवला. नेताजीनगरातील गजानन तकीतकर यांच्या सात मुलींनी परंपरा डावलून वडिलांना खांदा देत भडाग्नी दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आधुनिक काळात मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. जमिनीपासून आकाशालाही गवसणी घातली. पण, आई-वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलगाच पाहिजे, ही समाजाची परंपरा. आजच्या काळात मुली अनेक ठिकाणी ही परंपरा मोडताना दिसत आहेत आणि असाच एक प्रसंग बुधवारी नागपुरातील गंगाबाई घाटावर सर्वांनी अनुभवला. नेताजीनगरातील गजानन तकीतकर यांच्या सात मुलींनी परंपरा डावलून वडिलांना खांदा देत भडाग्नी दिला.पारडी परिसरातील नेताजीनगर येथील गजानन गोविंदराव तकीतकर (८०) यांचे ३ सप्टेंबरला निधन झाले. ते रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मुलगा नसून सात मुली आहेत. या सातही मुलींचे लग्न झाले आहे. या मुली नागपुरात, भंडारा आणि दिल्लीत राहतात. वडिलांच्या निधनाची वार्ता कळताच वंदना झोडे, संगीता पिसे, योगिता भलमे, अरुणा चांदेकर, करुणा बोरकर, संध्या आगाशे या सहा मुली त्यांच्या घरी पोहोचल्या. तर दिल्ली येथे राहणारी मुलगी राखी सातोने ही येण्यासाठी वेळ असल्यामुळे अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी ४ सप्टेंबरला करण्याचे ठरविण्यात आले. दुसऱ्या दिवशी दिल्लीतील मुलगी आल्यानंतर सातही मुली अंत्यसंस्कारासाठी पुढे आल्या. सात बहिणींनी वडिलांना खांदा दिला, तर एका बहिणीने आकटं पकडले. गंगाबाई घाट येथे अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर सातही भगिनींनी वडिलांच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. तकीतकर यांच्या मुलींनी वडिलांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करून मुलीही मुलाचे कर्तव्य बजावू शकतात, हे समाजाला दाखवून दिले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर