शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  शौचालय कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:55 IST

सुलभ शौचालयात दारू पिण्यास मनाई केली म्हणून तेथील कर्मचाऱ्याची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. राजेश ऊर्फ रज्जू रामनारायण यादव (वय ३८) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या रामनगर चौकाजवळ गुरुवारी भरदुपारी ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देदारू पिण्यास मनाई केल्याने काढला काटा : दोन आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुलभ शौचालयात दारू पिण्यास मनाई केली म्हणून तेथील कर्मचाऱ्याची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. राजेश ऊर्फ रज्जू रामनारायण यादव (वय ३८) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या रामनगर चौकाजवळ गुरुवारी भरदुपारी ही थरारक घटना घडली. रितू केसावड (२२) आणि मुनीम तिवारी (२८), अशी आरोपींची नावे आहेत.आरोपी रितू आणि मुनीम हे दोघे दारूडे असून, ते या भागात गुंडगिरीही करतात. ते नेहमीच शौचायलात येऊन साथीदारांसह दारू प्यायचे. वारंवार येथे येऊन दारू पीत असल्याने यादवने त्यांना तेथे येण्यास मनाई केली होती. त्यामुळे आरोपी हे यादवला धडा शिकविण्याच्या तयारीत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास आरोपी रितू, मुनीम त्यांच्या तीन-चार साथीदारांसह दारूची बाटली घेऊन शौचालयाजवळ आले. ते पाहून यादवने त्यांना तेथे दारू पिण्यास मनाई केली. परिणामी रितू आणि मुनीमने त्याला शिवीगाळ केली. काही वेळेनंतर आरोपी रितू आणि मुनीमने यादवला खेचतच मुनीमच्या भावाच्या उसाच्या रसाच्या हातठेल्याजवळ आणले. ते पाहून त्यांचे साथीदार पळून गेले. यादवला शिवीगाळ करीत बरफ बारीक करण्याचा लाकडी दंडा आणि सत्तूरचे फटके यादवच्या डोक्यावर हाणले. तो बाजूच्या खुर्चीवर पडताच आरोपी पळून गेले. मोठ्या रक्तस्रावामुळे यादवचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा अनेकांसमोर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात थरार निर्माण झाला.मध्यप्रदेशात पळून जाण्याची तयारीया हत्याकांडाची माहिती कळताच पोलीस उपायुक्त राकेश ओला, अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली. आरोपी रेल्वेने मध्यप्रदेशात नातेवाईकांकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे कळताच अंबाझरीचे पोलीस पथक रेल्वेस्थानकाकडे धावले. तिकीट काढून रेल्वेगाडीत बसण्याच्या तयारीत असलेले आरोपी रितू आणि मुनीमला पोलिसांनी अटक केली.मृताचा परिवार उघड्यावरमृत राजेश हा आधी गुन्हेगारीत सक्रीय होता. त्याला पत्नी भाग्यश्री तसेच यश, वंश आणि अन्य एक मुलगा आहे. राजेशच्या मृत्युमुळे त्याचा परिवार उघड्यावर आला आहे. राजेशचा भाऊ कमलेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर