लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी येथील एका तरुणीसह तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पारडी पूनापुर मार्गावरील शाम नगरात राहणारी कल्पना विनोद भारद्वाज (वय २२) हिने ८ ऑगस्टच्या सकाळी विष प्राशन केले. उपचारासाठी तिला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी सकाळी ५.२५ च्या सुमारास डॉक्टरांनी कल्पनाला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून पारडीचे हवालदार बाळकृष्ण धुर्वे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे वासुदेव गुलाबराव थोटे (वय ४७) यांनी १२ ऑगस्टला विष प्राशन केले. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.इमामवाडा बारा सिंगल परिसरात राहणारे मनोज काशिनाथ बसेला (वय ५३) यांनी ६ ऑगस्टला विष घेतले होते. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात तरुणीसह तिघांनी घेतला विषाचा घोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:19 IST