शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सायबर गुन्हेगाराची खंडणीसाठी धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 15:46 IST

लंडनहून पार्सल आले आहे, असे सांगून नागालॅण्डमधील एका आरोपीने सिखा आनंद (वय ३४ रा. तेलीपुरा, गणेशपेठ) नामक महिलेला १ लाख, १९ हजारांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. रक्कम दिली नाही तर तुझ्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलंडनच्या पार्सलचे आमिष : पैसे उकळण्यासाठी मुलीला मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लंडनहून पार्सल आले आहे, असे सांगून नागालॅण्डमधील एका आरोपीने सिखा आनंद (वय ३४ रा. तेलीपुरा, गणेशपेठ) नामक महिलेला १ लाख, १९ हजारांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. रक्कम दिली नाही तर तुझ्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.फिर्यादी महिला शिक्षिका आहेत. १० मार्चला दुपारी ४ वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन आला. आपण तोविका अड्डमी बोलतो, असे सांगत आरोपीने सिखा यांना तुमचे लंडनहून पार्सल आले आहे. ते सोडविण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील, असे म्हटले. सिखा यांनी आरोपीला कुठून बोलता असे विचारले असता नागालँडमधून बोलतो, असे सांगितले. १ लाख, २० हजार रुपये भरले नाही तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवू आणि तुमच्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. त्यामुळे सिखा घाबरल्या. त्यांनी लगेच आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यात १ लाख, १९ हजार रुपये जमा केले.पैसे वाचले, आरोपीची शोधाशोधपैसे जमा केल्यानंतर त्यांनी हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी त्यांना पोलिसांकडे नेले. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीचे बँक खाते फ्रीज केले. त्यामुळे सिखा यांची रक्कम वाचली. प्राथमिक चौकशीत आरोपी दिल्ली येथील असावा, असा संशय अधोरेखित झाला आहे. गणेशपेठचे पीएसआय एस. पी. इंगळे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर