शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात धमकी देणाऱ्या गुंडाला दगडाने ठेचून मारले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 21:08 IST

Goon stoned to death, crime news, Nagpur कपिलनगर पोलीस ठाणे अंतर्गत आवळेनगरात एका युवकाने त्याला धमकावणाऱ्या गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देदारु पिताना झाला वाद : चार दिवसातील तिसरी थरारक घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कपिलनगर पोलीस ठाणे अंतर्गत आवळेनगरात एका युवकाने त्याला धमकावणाऱ्या गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलिसांनी आरोपी राकेश मोतीलाल पटेल (३२) रा.मानव नगर याला अटक केली. शैलेश बालाजी देशभ्रतार (३४) रा. आवळेनगर असे मृताचे नाव आहे. कपिलनगरातचार दिवसात खुनाची ही दुसरी तर शहरातील तिसरी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

शैलेश जुना गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे तो लोकांना आपल्या दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न करीत असे. नेहमीच क्षुल्लक कारणावरून लोकांना मारहाण करायचा. राकेशसोबतही त्याची ओळख होती. दोघांनी दुपारी ३.३० वाजता आवळेनगरातील देशी दारूच्या दुकानातून दारू खरेदी केली. एकाखाली भूखंडावर जाऊन ते दारू पिऊ लागले. यादरम्यान शैलेश मारहाण करीत राकेशला धमकावू लागला. दोघांमध्ये वाद झाला. शैलेश खून करण्याची धमकी देऊ लागला. नंतर नशा अधिक झाल्याने शैलेश तिथेच झोपला. त्याला झोपल्याचे पाहून राकेशने दगडाने त्याचे डोके ठेचून त्याचा खून केला. घटनेची माहिती होताच कपिलनगर पोलीस व डीसीपी नीलोत्पल घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी राकेशला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.

गेल्या चार दिवसातील खुनाची ही दुसरी घटना आहे. रविवारी रात्री तडीपार दीपक ऊर्फ गोलू राजपूत याची त्याचाच साथीदार तुषार गजभिये व प्रेमचंद ऊर्फ टोनी मारोतकर याने हत्या केली होती. तिघेही जुने मित्र आहेत. तुषारने त्याच्या बहिणीला त्रास देत असल्यामुळे हत्या केल्याचे सांगितले आहे. परंतु सूत्रानुसार परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून सुरु असलेल्या गॅंगवॉरमुळे खून झाल्याचे सांगितले जाते. गोलूचा परिसरात दबदबा होता. तो संपवण्यासाठी आरोपींनी गोलूची हत्या केली. बुधवारी रात्री सुद्धा गुन्हेगारांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून