शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नागपूर: पाणीटंचाई नसल्याचा मनपाचा दावा मात्र दररोज टँकरच्या २,४०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:44 IST

नागपूर शहराला मागणीच्या तुलनेत अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाण्यासाठी ओरड सुरु आहे.

ठळक मुद्दे३४२ टँकरद्वारे पाणीपुरवठातीन महिन्यात ६.१२ कोटींचा खर्च फेब्रुवारीच्या तुलनेत जानेवारीत अधिक खर्चाचे कोडे

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला मागणीच्या तुलनेत अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाण्यासाठी ओरड सुरु आहे. नळाचे नेटवर्क नसलेल्या शहरालगतच्या वस्त्यांत मागील अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. दरवर्षी टँकरची संख्या वाढतच आहे. ३४२ टँकरद्वारे दररोज १७६२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. एप्रिल महिन्यात पाण्याची मागणी वाढल्याने हा आकडा २,४०० पर्यंत पोहचला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत ३४२ टँकरद्वारे १ लाख ५८ हजार ५९७ फेऱ्या मारण्यात आल्या. यावर ६ कोटी १२ लाख १८ हजार ४४२ रुपये खर्च करण्यात आला. एप्रिल महिन्यात ७२ हजार २,२७५ फेऱ्या होतील, असा अंदाज जलप्रदाय विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केला. म्हणजेच महापालिकेला शहरालगतच्या पाणीपुरवठ्यावर दर महिन्याला दोन कोटीहून अधिक खर्च क रावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी टँकरवरील खर्चात वाढ झाली आहे. सर्वाधिक १०५ टँकर लकडगंज झोनमध्ये आहेत. या झोनमध्ये टँकरच्या दररोज ६०० फेऱ्या होतात. आसीनगर झोनमध्ये ८७ टँकर धावत आहेत. महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागात ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नेहरूनगर झोनमध्ये ३९ तर हनुमाननगर झोनमधील आऊ टर भागात १४ टँकर धावत आहते. प्रत्येक टँकरच्या सरासरी ५ ते ६ फेऱ्या होतात. मात्र मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत टँकची सर्वाधिक संख्या असते. यामुळे फेऱ्या वाढतात.

नेटवर्कच्या भागात ६६ टँकरशहरातील नेटवर्क असूनही अनेकदा पाणीपुरवठा खंडित करावा लागतो. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. अशा वस्त्यांतील लोकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात अशा तक्रारी वाढतात. सध्या यासाठी ६६ टँकर लावण्यात आले आहेत.थंडीच्या दिवसात अधिक टँकरफेब्रुवारीच्या तुलनेत जानेवारी महिना अधिक थंडीच्या असतो. या दिवसात पाण्याची मागणी कमी असते. असे असूनही फेब्रुवारी  महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात टँकरची संख्या अधिक दर्शविण्यात आली आहे. जानेवारीत ५२ हजार ८४१ टँकर फेऱ्या असून फेब्रुवारी  महिन्यात मात्र ४५ हजार ४७८ फेऱ्या दर्शविण्यात आल्या आहेत. म्हणजेच जानेवारी महिन्यात टँकरच्या ७,३६१ फेऱ्या अधिक आहेत. थंडीच्या दिवसात टँकर क से वाढले, हा संशोधनाचाच विषय आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका