शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वाहतूकदारांच्या संपाचा तिसरा दिवस; जीवनावश्यक वस्तू महाग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:21 IST

ट्रकमालक व वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी भाजीपाला आणि दुधाच्या टँकरची वाहतूक कमी झाली आहे.

ठळक मुद्देसरकारची चर्चेसाठी टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रकमालक व वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी भाजीपाला आणि दुधाच्या टँकरची वाहतूक कमी झाली आहे. केंद्र सरकारचे मंत्री संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे संप आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. संपाच्या तीन दिवसात नागपुरात वाहतूकदारांचा जवळपास ५० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना दिली.संघटनेने जीवनावश्यक वस्तूंना संपातून वगळले असले तरीही ट्रक मालक आणि वाहतूकदार या मालाची वाहतूक करण्यास मनाई करीत आहेत. संपामुळे आवश्यक वस्तू एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात आणि राज्यातून अन्य राज्यात नेण्यास प्रतिबंध आले आहेत. त्यांचा फटका गरीब, सामान्यांसह व्यापारी आणि शेतकºयांना बसत आहे. अन्य राज्यातून भाजीपाला आणण्यास ट्रक मालकांनी मनाई केली आहे. हा संप आणखी ७ ते ८ दिवस सुरू राहिल्यास जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊन किमती आकाशाला भिडतील, अशी भीती मारवाह यांनी व्यक्त केली.केंद्र शासनाने मागण्या मान्य कराव्यासंपापूर्वी केंद्रीय पीयूष गोयल आणि नितीन गडकरी यांच्याशी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष एस.के. मित्तल यांनी चर्चा केली होती. पण त्यांनी मागण्या मान्य करण्यास वा चर्चेस मनाई केली. तीन महिन्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीही आश्वासनाने संप मागे घेतला होता. त्यानंतर सरकारने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुठलीही चर्चा केली नाही. आता चर्चा नाही, तर कृती हवी, असे मारवाह यांनी सांगितले.

वस्तूंच्या महाग किमतीसाठी सरकार दोषीमारवाह म्हणाले, संपामुळे विविध राज्यातून येणाऱ्या औषधांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मेडिकल स्टोरमध्ये आवश्यक औषध मिळणार नाही. नागपुरात बटाटे कानपूर आणि अलाहाबाद येथून येतात. मिरची आंध्रच्या गुंटूर येथून तर विजयवाडा येथून हळद येते. आता सणासुदीत नारळ आंध्रप्रदेश आणि केरळातून मोठ्या प्रमाणात येतात. संपाचा धान्याच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. दुधाचे टँकरही बंद होतील. वाहतूक बंद झाल्यामुळे जीवनाश्यक माल येणार नाही आणि त्याच्या कमतरतेमुळे किमती आकाशाला भिडतील. याकरिता केंद्र सरकार दोषी राहील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Strikeसंप