शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नागपूर : होस्टेलमध्येच सुरू असलेले नर्सिंग कॉलेज आता बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 19:05 IST

मेडिकल नर्सिंग कॉलेजच्या इमारतीसाठी ५० कोटी मंजूर

नागपूर : आशिया खंडातील दुसºया क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजला स्वत:ची इमारतच नाही. आजही याचे कॉलेजचे वर्ग होस्टेलमध्येच भरतात. तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाºया जम्मू-काश्मीरमधील शीतल राजकुमार या विद्यार्थिनीचा ५ जुलै रोजी एका आजाराने अचानक मृत्यू झाला. या मृत्यूला कारणीभूत असलेल्या होस्टेलमधील समस्या ठळकपणे पुढे आल्या. कॉलेजला स्वत:ची इमारतच नसल्याची आणि नर्सिंगचे वर्ग चक्क होस्टेलमध्ये भरत असल्याची बाबही समोर आली. विशेष म्हणजे, १९५८ मध्ये   मेडिकलचा बांधकामाचा नकाशात नर्सिंग कॉलेजची स्वतंत्र इमारत मंजूर होती.

कॉलेजची इमारत बांधण्यापूर्वी नर्सिंग होस्टेलचे बांधकाम झाले. त्यानंतर होस्टेलसमोरील मोकळ्या भूखंडावर नर्सिंगची स्वतंत्र इमारत तयार होणार होती. परंतु नंतर कोणीच पुढाकार घेतला नाही. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पदभार सांभाळल्यानंतर नर्सिंग कॉलेजच्या बांधकामला गंभीरतेने घेतले होते. त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच जुलै महिन्यात एका विद्यार्थिनीच्या अचानक मृत्यूने नर्सिंग कॉलेजमधील गैरसोयींचा पाढाच वाचण्यात आला. परिणामी, सरकारनेही याची दखल घेत कॉलेजच्या बांधकामासाठी ५० कोटी ६५ लाख ७१ हजार ८५३ रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता दिली. 

होस्टेलमध्ये बीएस.सी. नर्सिंगचे वर्ग

२००६ पासून बीएस.सी नर्सिंग सुरू झाले. या नव्या अभ्यासक्रमाचे वर्गही याच होस्टेलमध्ये सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोयही वसतिगृहात होत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच येथील शिक्षकांसाठी गैरसोयीचे होत होते. उशीरा का होईना आता कॉलेजची स्वतंत्र इमारत होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला.

७७ कोटींचा होता प्रस्ताव 

नर्सिंग कॉलेजचा इमारतीचा ७७ कोटींचा प्रस्ताव होता, परंतु मान्यात ५० कोटी ६५ लाख रुपयांनाच मिळाली. यामुळे इमारत तीन मजलीची राहणार असलीतरी काही वर्ग खोल्या कमी होण्याची शक्यता आहे.

नर्सिंग कॉलेजचा प्रगतीसाठी प्रयत्न 

मेडिकल नर्सिंग कॉलेजला स्वतंत्र इमारत असावी यााठी सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश मिळाले. बांधकामासाठी ५० कोटी ६५ लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. मेडिकल कॉलेजचा अमृत महोत्सव होऊ घातला असताना नर्सिंग कॉलेजची इमारत होणे हा मोठा दिलासा आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासही मदत होईल.

-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल