शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे तापमान ४२ अंशावर : उष्माघाताचे ४७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:41 IST

शहराचे तापमान ४२ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नागपुरात ३६४ रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. मेयो, मेडिकलमध्ये मात्र, अद्यापही शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.

ठळक मुद्देगेल्या वर्षी ३६४ रुग्णांची नोंद : मेयो, मेडिकलचे शीतकक्ष अद्यापही बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे तापमान ४२ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नागपुरात ३६४ रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. मेयो, मेडिकलमध्ये मात्र, अद्यापही शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.बदलत्या नैसर्गिक वातावरणाचा दुष्परिणाम शरीरावर होतो. यात सर्वात जास्त तापदायक ठरतो तो उन्हाळा. या ऋतूमध्ये विशेषत: उष्माघाताचे रुग्ण सर्वात जास्त दिसून येतात. यामुळे मेयो, मेडिकलमध्ये दहा-दहा खाटांचे ‘कोल्ड वॉर्ड’ (शीतकक्ष) सुरू करण्यात येतात. उष्माघाताची लक्षणे असलेले रुग्ण दिसून येत असलेतरी या दोन्ही रुग्णालयाचे ‘कोल्ड वॉर्ड’ आपल्या नेहमीच्या तारखेस म्हणजे १५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. सध्या या वॉर्डातील कुलरच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही रुग्णालय उष्माघाताचे रुग्णच दाखवत नाही. सूत्रानुसार, अशा रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठवावी लागते. रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करावे लागते. ते टाळण्यासाठी मेयो, मेडिकल आणि खासगी इस्पितळांमध्ये उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे रुग्ण म्हणून उपचार करतात.मुले व वृद्धांना सर्वाधिक धोकावैद्यकीय तज्ज्ञाानुसार, लहान मुले आणि वृद्धांना उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो. या शिवाय हायपरटेन्शन, मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि यकृताच्या रुग्णांनाही हा आजार होऊ शकतो. शिवाय, मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करणाऱ्यांना व तापमानात जास्त कष्टाचे काम करणाऱ्यांनाही होऊ शकतो.उष्माघाताची लक्षणे१०४ डिग्री सेल्सिअसवर ताप जाणे, खूप डोके दुखणे, चिडचिडणे, रुग्णाला काही न समजणे, लघवीचा रंग गडद किंवा कमी असणे, श्वासोच्छवास जोरात चालणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा स्थितीत मेंदू, किडनी, हृदय, मांसपेशी आणि दुसरे अवयव किंवा पूर्ण शरीराची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते.उष्माघात झाल्यावर हे करारुग्णाला थंड वातावरणात ठेवा. त्याचे कपडे सैल करा. थंड पाण्यात भिजवलेल्या कापडाने रुग्णाचे अंग पुसून त्याला थंड करा. रुग्णाला मीठ आणि साखरेचे भरपूर प्रमाण असलेले पेय द्या. तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जा. लवकरात लवकर रुग्ण इस्पितळात पोहचल्यास त्याच्या वाचण्याची शक्यताही वाढते.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर