शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयतृतीयेला नागपूरच्या  बाजारात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:58 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला भारतात खूप महत्त्व आहे. यादिवशी विशेषत्वाने सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीला प्राधान्य दिल्या जाते. अक्षयतृतीयेला दागिने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, असे मानण्यात येते. यामुळेच बुधवारी अक्षयतृतीयेला शहरातील सराफा दुकानात चांगलीच धनवर्षा झाली.

ठळक मुद्देसोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्रमी विक्री : दुचाकी, चारचाकी वाहनांचीही खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला भारतात खूप महत्त्व आहे. यादिवशी विशेषत्वाने सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीला प्राधान्य दिल्या जाते. अक्षयतृतीयेला दागिने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, असे मानण्यात येते. यामुळेच बुधवारी अक्षयतृतीयेला शहरातील सराफा दुकानात चांगलीच धनवर्षा झाली. लग्नसमारंभासाठी नागरिकांनी आपल्या पसंतीनुसार नव्या डिझाईनचे दागिने खरेदी केले. यामुळे शहरात कोट्यवधी रुपयांचे दागिने विकल्या गेल्याचा अंदाज आहे. तर एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे खरेदीवर प्रभाव पडल्याचे पाहावयास मिळाले.शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक राजेश रोकडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, यावर्षी अक्षयतृतीयेला अपेक्षेपेक्षा खूप चांगला व्यवसाय झाला. शहरात तीन हजारापेक्षा अधिक सराफा दुकाने आहेत. या दुकानात दिवसभर ग्राहकांची रेलचेल सुरू होती. अक्षयतृतीयेनिमित्त सराफा व्यापाºयांनी नव्या डिझाईनचे विशेष दागिन्यांचे कलेक्शन सादर केले होते. या दागिन्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळातील लग्नसमारंभासाठी नागरिकांनी अक्षयतृतीयेच्या दिवशी दागिन्यांची खरेदी केली. यामुळे एकाच दिवशी शहरभर कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. यात शहरातील गारमेंट शो रुममध्येही दिवसभर ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळाली. लग्नाची शेरवानी, वधूचा लहंगा, सुट आदीची जोरात विक्री झाली. आॅटोमोबाईल शो रुममध्येही गर्दी होती. येथे आधी बुक केलेल्या वाहनांची अक्षयतृतीयेला डिलिव्हरी करण्यात आली. नागरिकांनी या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी केली. इतवारीच्या भांडेओळ, सीताबर्डीतील मोबाईल मार्केटमध्ये चांगला व्यवसाय झाल्याची माहिती आहे.क्रेडिट कार्ड, चेकने दिले पैसेअक्षयतृतीयेला खरेदीसाठी बाजारात गेलेल्या ग्राहकांना एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे अडचण आली. सराफा दुकानात दागिने पसंत केल्यानंतर त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळे अनेक ग्राहकांनी क्रेडिट/डेबिट कार्ड आणि चेक देऊन रक्कम चुकती केली. ते काही असो अक्षयतृतीयेनिमित्त दुकानदारांची चांदी झाली, हे विशेष.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाnagpurनागपूर