शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

नागपुरात अंध व अपंगांचे राज्यस्तरीय साहित्य व कला संमेलन शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:16 IST

येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अंध व अपंगांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. नामांकित हास्य कवी एहसान कुरेशी यांच्या कवितांसह ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे संचालित अंध व अपंग ५० कलावंतांचे सादरीकरण संमेलनाच्या उदघाटन समारोहाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे, एहसान कुरेशी यांची उपस्थितीअनंत ढोले संमेलनाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अंध व अपंगांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. नामांकित हास्य कवी एहसान कुरेशी यांच्या कवितांसह ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे संचालित अंध व अपंग ५० कलावंतांचे सादरीकरण संमेलनाच्या उदघाटन समारोहाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.संमेलनाचे संयोजक आमदार प्रकाश गजभिये यांनी बुधवारी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे या तिसऱ्या संमेलनाचे आयोजन होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक अनंत विष्णू ढोले हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राकाँपाचे प्रदेशाध्यक्ष सुहास तेंडुलकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संयोजक विजय कान्हेकर यांच्यासह शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापौर नंदाताई जिचकार, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, डॉ. राजू देशमुख, डॉ. उदय बोधनकर, गुणेश्वर आरीकर, शोएब असद आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, संमेलनाध्यक्षांची मुलाखत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. या संमेलनात अपंगांच्या हिताचे १९ ठराव पारित करून शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले. संमेलनात राज्यभरातून अपंग लेखक, साहित्यिक आणि ५०० ते ७०० लोक सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या माध्यमातून अंध व अपंग साहित्यिक व कलावंतांना मंच उपलब्ध करून देणे व अभिव्यक्तिकौशल्य व कला आविष्कारातून त्यांचा संघर्ष व उपलब्धी समाजापर्यंत पोहचविणे हा संमेलनाचा उद्देश असल्याचे गजभिये यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर