शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर स्मार्ट सिटी क्षेत्रात १२०० बांधकामे तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 10:18 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १२०० बांधकाम तुटणार असून ७४५ मालमत्ता काही प्रमाणात प्रभावित होणार आहेत.

ठळक मुद्दे७४५ मालमत्ता काही प्रमाणात बाधित होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा व भांडेवाडी परिसरातील एरिया बेस डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. यासाठी सिटी सर्व्हे क्रमांकाच्या आधारावर प्रारूप प्रकाशित करण्यात आले आहे. यावर नागरिकांना आक्षेप व हरकती ७ मे पर्यंत नोंदविता येतील. एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये रस्ते, उद्यान, बाजार आदी विकास कामे केली जाणार आहेत. यात १२०० बांधकाम तुटणार असून ७४५ मालमत्ता काही प्रमाणात प्रभावित होणार आहेत. या प्रकल्पाचा या परिसरातील २५ हजारांहून अधिक लोकांना लाभ होणार आहे.अहमदाबादच्या एचपीसी डिझाईन, प्लानिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट प्रा.लिमिटेडतर्फे निवासी संकुलाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेत ३० मीटर, २४ मीटर, १८ व ९ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. तसेच उद्यान, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, व्यावसायिक संकुल अशा विकास कामांसाठी जमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी जमीन मालकाला मोबदला दिला जाणार आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांचे नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्याची योजना आहे. लकडगंज झोन व महापालिका मुख्यालयात स्मार्ट सिटी विभागातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्यांच्या जमिनी वा जागा यात जाणार आहेत त्यांनी आवश्यक शुल्क भरून आपल्या जमिनीची माहिती प्राप्त करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. सिटी सर्वे विभागाच्या रेकॉर्डनुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे ज्या जमीन मालकांनी नावे सिटी सर्वे विभागाकडे नोंद केलेली नाही. अशा लोकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.स्मार्ट सिटी प्रकल्प क्षेत्रात नासुप्र वा महापालिकेतर्फे मंजूर करण्यात आलेल्या ले-आऊ टवर याचा कोणताही प्ररिणाम होणार नाही. खाली प्लॉट टीपी योजनेंतर्गत जमीन मालकांच्या अनुमतीने घेतली जात आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाºयांचे नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. या भागाचा नियोजनबद्ध विकास क रण्यात येणार आहे.डॉ. रामनाथ सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी प्रकल्प

टॅग्स :Metroमेट्रो