शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सहा जणांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:58 IST

शहरातील विविध भागात गेल्या २४ तासात सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात तीन तरुणांचाही समावेश आहे. या घटनांमुळे विविध भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्दे२४ तासात घडल्या घटना : तीन तरुणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागात गेल्या २४ तासात सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात तीन तरुणांचाही समावेश आहे. या घटनांमुळे विविध भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायण पेठमध्ये राहणारे विवेक माणिकराव लाडकर (वय ३०) यांनी गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. मंगेश माणिकराव लाडकर यांनी दिलेल्या सूचनेवरून शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विवेक यांच्या आत्महत्येचे कारण जाणून घेतले जात आहे.हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आम्रपाली नगरात राहणारे जगन्नाथ गुणवंतराव ठाकरे (वय ६२) यांनी गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. आतिश रमेश कडबे यांनी दिलेल्या सूचनेवरून हुडकेश्­वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.एमआयडीसीतील हिंगणा मार्गावर राहणारे दिलीप दास (वय ३५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुधा दिलीप दास यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.दास यांच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेतले जात आहे.इमामवाड्यातील पाचनळ चौकात राहणारे अमोल जीवन पोटपोसे (वय २५) यांनी गळफास लावून घेतला. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.हुडकेश्वरमधील गुरुकुंज नगरात राहणारे शालिकराम माणिकराव धारपुरे (वय ७०) यांनी शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. शीतल अनिल धारपुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.मानकापुरातील नर्मदा हाऊसिंग सोसायटीत राहणारे अभिषेक अभय दुबे (वय २०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेतले जात आहे.स्टोव्हच्या भडक्याने तरुणाचा मृत्यूकामठी मार्गावरील नाका नंबर २ जवळ राहणारा हमाम रशीद शेख (वय २०) याचा स्टोव्हचा भडका उडून भाजल्यामुळे मृत्यू झाला. ६ जूनला रात्रीच्या वेळी तो पाणी गरम करत असताना स्टोव्हचा भडका उडाला. त्यामुळे तो गंभीररीत्या भाजला होता. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी दुपारी ११.५० च्या सुमारास डॉक्टरांनी हमाम याला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर