शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानी गारठली; २४ तासात ३ अंशांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 10:50 IST

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ७.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक थंड राहिले.

ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी सर्वाधिक थंडी२९ डिसेंबर १९६८ रोजी नागपुरात ५.५ अंश तापमानाची नोंद झाली होती. २९ डिसेंबर २०१४ रोजी हा रेकॉर्ड तुटला. या दिवशी पारा ५ अंशापर्यंत खाली घसरला होता.

आॅनलाईन लोकमतनागपूर : हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ७.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक थंड राहिले. सरासरीपेक्षा ५ अंशांनी तापमान कमी झाल्यामुळे शहरात शीतलहर जाणवू लागली आहे.विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. थंड वाऱ्यांचा जोर वाढला आहे. हवामान खात्यानुसार देशाच्या उत्तर भागात होत असलेली बर्फवृष्टी व वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे थंडी वाढली आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी नागपूरचे किमान तापमान १०.८ अंश होते. बुधवारी त्यात ३ अंशांनी घट आली. ७.८ अंश तापमानासह बुधवार या मोसमातील सर्वात थंड दिवस राहिला. नागपुरात साधारणत: डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी असते. दिवसाचे तापमान मात्र सामान्य राहते. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्यभारताच्या हवामानात बदल आला आहे. मध्य प्रदेशातील पचमढीचे तापमान २ अंशावर पोहचले आहे.नागपुरात या मोसमात १९ डिसेंबर रोजी पहिल्यांदा पारा १० अंशाखाली घसरला होता. या दिवशी किमान तापमान ८.९ अंश सेल्सियसवर पोहचले होते. थंडीचा हा रेकॉर्ड बुधवारी पारा ७.८ अंशांवर पोहचताच तुटला. पारा ८ अंशाखाली गेल्याने शहरात शीतलहर जाणवू लागली आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग