शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सत्र न्यायालय :  वडिलाचा खून करणाऱ्या मुलाला दहा वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:14 IST

सत्र न्यायालयाने वडिलाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या मुलाला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्दे१० हजार रुपये दंडही ठोठावला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने वडिलाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या मुलाला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी हा निर्णय दिला. ही घटना तहसील पोलिसांच्या हद्दीत घडली होती.अमित श्यामसुंदर नायडू (३४) असे आरोपीचे नाव असून तो रेल्वे क्वॉर्टर येथील रहिवासी आहे. त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात (भादंवि कलम ३०४-दोन) दोषी ठरविण्यात आले. अमित काहीच कामधंदा करीत नव्हता. त्याला दारुचे व्यसन होते. गुन्हेगारी वृत्तीमुळे तो अनेकदा कारागृहात गेला होता. त्यामुळे मध्य रेल्वेत कार्यरत वडील श्यामसुंदर त्याच्यावर चिडचिड करीत होते. १० एप्रिल २०१८ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास अमित व श्यामसुंदर यांचे कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, श्यामसुंदर यांनी अमितला थापड मारली. त्यावरून चिडून अमितने श्यामसुंदर यांना स्टीलच्या गंजाने व लाकडी फळीने जबर मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयMurderखून