शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नरेंद्रनगरातील पेट्रोलपंप लुटण्याचा प्रयत्न; चाकू हल्ल्यात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 14:48 IST

चाकूने हल्ला करून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न नागपुरातील नरेंद्रनगरात असलेल्या एका पेट्रोलपंपवर बुधवारी रात्री झाला. या घटनेत पंपावरील एक कर्मचारी जबर जखमी झाला असून परिसरात दहशत निर्माण झाली होती.

ठळक मुद्देसीसीटीव्हीत घटना कैद लुटमारीची ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली. त्यात दोन आरोपी लपतछपत पायी आल्याचे आणि त्यांनी नितीनवर चाकूहल्ला करून रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. अजनी पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चाकूने हल्ला करून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न नागपुरातील नरेंद्रनगरात असलेल्या एका पेट्रोलपंपवर बुधवारी रात्री झाला. या घटनेत पंपावरील एक कर्मचारी जबर जखमी झाला असून परिसरात दहशत निर्माण झाली होती.नरेंद्रनगर पुलाच्या बाजुला वैष्णवी पेट्रोल पंप आहे. या भागात वर्दळीच्या मार्गावर हा एकमात्र पेट्रोल पंप असल्यामुळे तेथे रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी असते. बुधवारी रात्री ९.५० वाजता वाहनचालकांना तेथील कर्मचारी पेट्रोल देत असताना दोन आरोपी आले. येथील कर्मचारी नितीन रमेश चिचघरे याला चाकू दाखवून त्यांनी त्याच्याजवळची रोकड असलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. नितीनने प्रतिकार करताच त्याच्या मानेखाली आरोपींनी चाकू मारला. गंभीर जखमी झालेला नितीन कॅबिनकडे पळून गेल्याने आरोपींनी दुसरा कर्मचारी शुभम शंकर जिवनापूरकर (वय २२) याच्याकडे धाव घेतली. मात्र नितीनच्या रक्ताने भरलेला चाकू बघून लुटारू आणि त्याचे सहकारी कर्मचारी घाबरले आणि त्यांनीही पळ काढला. तत्पूर्वीच पंपावर पेट्रोल भरायला आलेले वाहनचालकही तेथून पळून गेले होते. वर्दळीच्या मार्गावर हा गुन्हा केल्यानंतर जास्त वेळ थांबणे धोकादायक असल्याचे लक्षात आल्याने आरोपी तिसऱ्या एका साथीदाराच्या मोटरसायकलवर बसून पळून गेले. दरम्यान, जखमी नितीनला त्याच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरकडे नेऊन अजनी पोलिसांना या घटनेची माहिती कळविली. त्यानंतर अजनी पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. एपीआय पुरी, पीएसआय वाय. व्ही. इंगळे यांनी आरोपींबाबत विचारणा केली. मात्र, त्यांची ओळख पटविणारा धागा पोलिसांच्या हाती लागला नाही. 

टॅग्स :Crimeगुन्हा