शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील शाळांना सर्व्हिस रोड आवश्यक; पालकमंत्र्यांनी दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:38 IST

नागपुरातील सर्व शाळांना सर्व्हिस रोड व स्वत:ची पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, यासंबंधात निर्देश देण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि एनएमआरडीतर्फे तशी नोटीस शाळांना बजावण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपार्किंगचीही करावी लागणार व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील ९० टक्के शाळांमध्ये सर्व्हिस रोड नाहीत. स्वत:ची पार्किंग नाही. शासकीय रस्त्यांचाच वापर केला जातो. पोद्दार इंटरनॅशनल शाळेत यामुळेच अपघात घडला. या पार्श्वभूमीवर नागपुरातील सर्व शाळांना सर्व्हिस रोड व स्वत:ची पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, यासंबंधात निर्देश देण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि एनएमआरडीतर्फे तशी नोटीस शाळांना बजावण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत दिली.पालकमंत्री म्हणाले, नवीन कायद्याप्रमाणे शाळांसाठी सर्व्हिस रोड आवश्यक आहे. शासकीय रोडचा वापर करता येत नाही. नागपुरातील अनेक शाळांमध्ये सर्व्हिस रोड नाही. तो करणे आवश्यक आहे तसेच पार्किंगचीही मोठी अडचण आहे. शाळा संचालकांना शाळांचा एफएसआय वाढवून इमारतीच्या खाली पार्किंगची व्यवस्था करता येऊ शकते. यासाठी वेळ लागेल, परंतु ते करवे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘त्या’ शाळेवर होणार कारवाईदाभा येथील सेंटर पॉर्इंट शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला विजेची हायटेन्शन लाईन गेल्याने धोका निर्माण झाला आहे. यासंबंधात संबंधित शाळेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कारवाईचा विचार सुरू असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. सोबतच हायटेन्शन लाईन काढून भूमिगत करण्याचा खर्च तब्बल २७०० कोटी रुपये आहे तर मोनोपोलेट करण्याचा खर्च हा २५० कोटी येत आहे. त्यामुळे मोनोपोलेट करण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

एफसीआयचे धान्य ओळखण्यासाठी वेगळा सिम्बॉल वापरणारमागील काही दिवसांत एफसीआय गोडाऊनमधील धान्य बाजारात पकडण्यात आले. परंतु बाजारातही एफसीआयसारखीच अनेक पोती आढळून आली आहेत. त्यामुळे एफसीआय गोडाऊनमधीलच ते धान्य आहे, हे सिद्ध करता येणे अडचणीचे होत आहे. त्यावर उपाय म्हणून आता एफसीआय गोडाऊनमधील धान्य हे स्पष्टपणे ओळखता यावे यासाठी एक वेगळे सिम्बॉल तयार करण्याबाबत विचार सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे