शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीणचे नवे एसपी राकेश ओला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:15 IST

नागपूर ग्रामीणचे नवीन एसपी (पोलीस अधीक्षक) म्हणून राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते आपल्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारू शकतात.

ठळक मुद्देकर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि हसतमुख अधिकारी म्हणून ख्याती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर ग्रामीणचे नवीन एसपी (पोलीस अधीक्षक) म्हणून राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते आपल्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारू शकतात.कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि हसतमुख अधिकारी म्हणून राकेश ओला यांनी वर्षभरात नागपुरात आपली प्रतिमा तयार केली आहे. २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले ओला सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली. त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले. मे १६ मध्ये त्यांची तेथून मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. जातीय दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या मालेगावात त्यांनी मे २०१७ पर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेथून ते जून २०१७ ला नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून बदलून आले. येथे त्यांना परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली. नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलीस बनून लुटणाऱ्या टोळीचा तसेच कारची काच फोडून रोकड आणि मौल्यवान चिजवस्तूंची बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला. याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचाही छडा लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमीका वठविली. कोणत्याही स्थितीत शांतपणे आणि हसतमुख काम करण्याची त्यांची शैली त्यांना ‘कुल आॅफिसर’ म्हणून ओळख देऊन गेली आहे. शुक्रवारी रात्री जारी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या यादीत त्यांचेही नाव असून, सरकारने त्यांना नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ग्रामीणमध्ये कोळसा आणि वाळू तस्करी हे दोन प्रमुख आव्हानं त्यांच्यापुढे आहे. कोळसा माफिया आणि वाळू तस्करांचे ते कंबरडे मोडतील, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसOlaओला