शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आरटीओने वसूल केले ३४२ कोटी        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:58 IST

राज्य शासनाला अनेक वर्षांपासून १०० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल देणारे नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चक्क गोदामात सुरू आहे. सोयींचा अभाव व अल्प मनुष्यबळ असतानाही दिलेल्या लक्ष्याच्यावर जाऊन म्हणजे ११७ टक्के लक्ष्य  (टार्गेट) गाठले. शासनाने गेल्या आर्थिक वर्षात २९३.९१ कोटींचे लक्ष्य दिले होते, कार्यालयाने विशेष परिश्रम घेत शासनाच्या तिजोरीत ३४२.५५ कोटी रुपये जमा केले.

ठळक मुद्देलक्ष्य होते २९३.९१ कोटींचे :  सोयींचा अभाव व कमी मनुष्यबळातही ११७ टक्के लक्ष्य पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राज्य शासनाला अनेक वर्षांपासून १०० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल देणारे नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चक्क गोदामात सुरू आहे. सोयींचा अभाव व अल्प मनुष्यबळ असतानाही दिलेल्या लक्ष्याच्यावर जाऊन म्हणजे ११७ टक्के लक्ष्य  (टार्गेट) गाठले. शासनाने गेल्या आर्थिक वर्षात २९३.९१ कोटींचे लक्ष्य दिले होते, कार्यालयाने विशेष परिश्रम घेत शासनाच्या तिजोरीत ३४२.५५ कोटी रुपये जमा केले.  कामठी मार्गावरील अन्न विभागाच्या लाल गोदामात गेल्या १० वर्षांपासून या आरटीओचे कामकाज सुरू आहे. गोदामच असल्याने येथे कुठल्याच सुविधा नाहीत. पिण्याचे पाणी किंवा लघुशंकेचीसुद्धा सोय नाही. स्वतंत्र इमारतीसाठी पहिल्यांदा २०१० साली शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र तीन वर्षे काहीच झाले नाही. २०१४ मध्ये स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. परंतु आता चार वर्षे होत असतानाही इमारतीचे बांधकामच सुरूच आहे. यामुळे आजही गोदामातच कार्यालय सुरू आहे. विशेष म्हणजे नागपूर ग्रामीणसह गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा आरटीओ कार्यालयाचा भारही या कार्यालयावर आहे. नागपूर विभागात दिवसाला सुमारे ३०० नवीन वाहनांची नोंद होते. यातील सर्वाधिक वाहनांची नोंद नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात होते.  वर्षभरात साधारण पाच लाख वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे आरटीओच्या कामाचा प्रचंड व्याप वाढला आहे. मात्र, त्यातुलनेत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या फारच अल्प आहे. अनेक वर्षांत रिक्त झालेली कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नाहीत. परिणामी, याचा फटका कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसत आहे. कठीण परिस्थितीतही लक्ष्यापेक्षा जास्त महसूल गोळा केल्याने अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांना याचे श्रेय देण्यात आले आहे.

 नागपूर ग्रामीण विभाग आरटीओअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांची स्थिती

कार्यालयाचे नाव     वार्षिक उद्दिष्ट        पूर्तता          टक्केवारी 
नागपूर ग्रामीण         १२६.४९ कोटी    १४४.३० कोटी    ११७ 
गडचिरोली               १८.३४ कोटी      २३.३३ कोटी    १२७ 

    चंद्रपूर                 ३८.०४ कोटी         ४२.१७ कोटी   १११

 
    गोंदिया                ८४.६२ कोटी        ९७.३८ कोटी   ११५ 
    भंडारा                 २६.०६ कोटी          ३०.८२ कोटी   ११८ 

एकूण (नागपूर विभाग)  २९३.९१ कोटी  ३४२.५५ कोटी  ११७

विशेष नियोजनामुळे लक्ष्य गाठता आलेअवघड परिस्थीती असतानाही अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतल्याने व विशेष नियोजन केल्याने  शासनाने दिलेले ११७ टक्के लक्ष्य पूर्ण करता आले. -श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर