शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
5
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
6
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
7
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
9
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
10
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
11
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
12
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
13
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
14
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
15
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
16
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
17
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
18
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
20
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार

नागपुरात विलगीकरण कक्षातील नागरिकांसाठी तीन महिन्यात जेवणावर ८५ लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:27 IST

एप्रिल ते जून या तीन महिन्यात नागपूर शहरातील विविध विलगीकरण केंद्रांमध्ये जेवणावर ८५ लाख रुपयांचा खर्च झाला.

ठळक मुद्दे दिवसाला दीड हजाराहून अधिक संशयितांना सरासरी ८८ हजारात कसे मिळाले जेवण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या महामारीचा अद्यापदेखील नागपूरकर सामना करत आहेत. लॉकडाऊन लागल्यापासून संशयितांचे विविध ठिकाणी विलगीकरण करण्यास सुरुवात झाली. विलगीकरण केंद्रांत नागरिकांच्या जेवणाची सोय मनपा प्रशासनाकडूनच करण्यात येत आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात शहरातील विविध विलगीकरण केंद्रांमध्ये जेवणावर ८५ लाख रुपयांचा खर्च झाला. या कालावधीत सरासरी प्रत्येक दिवशीचा खर्च हा ८८ हजारांच्या घरात होता. मात्र १ मेपासून विलगीकरण केंद्रातील लोकांची संख्या लक्षात घेता दर दिवशी जेवणाचा खर्च लाखांच्या घरात जाणे अपेक्षित होते. अशा स्थितीत केवळ ८८ हजारांत हजारो लोकांचे दोन्ही वेळचे जेवणाची व्यवस्था कशी काय झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मनपाच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली होती. २५ मार्च ते ३० जून या कालावधीत विलगीकरण कक्षात राहणाऱ्यांच्या जेवणावर किती खर्च झाला, कोरोनासाठी मनपाला राज्य किंवा केंद्र शासनाने किती रक्कम दिली व त्यातील किती रक्कम खर्च झाली इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २५ मार्च ते ३० जून या कालावधीत विलगीकरण कक्षांमधील लोकांच्या जेवणावर एकूण ८५ लाख ८९ हजार ९१० रुपये खर्च झाले. याचाच अर्थ सरासरी दररोज ८८ हजारांच्या आसपास खर्च झाला. एप्रिल महिना सोडला तर विलगीकरण कक्षांमध्ये दीड हजारांहून अधिकच लोक होते. ३० एप्रिल रोजी १ हजार ६७८ लोक होते, तर ३१ मे रोजी ही संख्या १ हजार ९२६ वर झाली. ३० जून रोजी संशयित रुग्णांची संख्या १ हजार ७८५ इतकी होती. या कालावधीत दररोजचे दीड हजार रुग्ण जरी पकडले तरी दोन वेळचे जेवण केवळ ६० ते ७० रुपयांत उपलब्ध झाल्याचे दिसून येते. इतक्या कमी किमतीत सकस जेवण मिळणे कितपत शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.- तीन महिन्यात केवळ ३९ टक्के रक्कम खर्च२५ मार्च ते ३० जून या कालावधीत मनपाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ५ कोटी २८ लाख रुपये प्राप्त झाले. यापैकी २ कोटी ७ लाख ९३ हजार ३५६ रुपयांची रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली. तीन महिन्यात मिळालेल्यापैकी केवळ ३९.३८ टक्के रक्कम खर्च झाली. यातील ९१ हजार १०० रुपये हे प्लास्टिकच्या खुर्च्यांवर खर्च झाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस