शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात गुलाब, मोगऱ्याचा सुगंध महागला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:26 IST

लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे लग्नसराईत फुले महागच : सजावटीची फुलांची आवक कमी

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.शुभकार्यांना विविध प्रकारच्या फुलांची गरज भासते. मे महिन्यासह जूनमध्येही लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. जादा फुलांची मागणी विक्रेत्यांकडे अगोदरच करावी लागत आहे. कडक ऊन आणि पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नाजूक फुले कोमेजून जात आहेत. त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी असून दरदिवशी आणि तासातासात भाव बदलत असल्याची माहिती अरोमा फ्लॉवरचे संचालक आणि महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.गुलाब व मोगऱ्याला सर्वाधिक मागणीलग्नसराईत मोगरा, गुलाब, निशिगंधा आणि सजावटीच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. गुलाब पुणे, मुक्ताईनगर, धुळे, बेंगळुरू येथून येत आहे. शुक्रवारी २०० ते २५० रुपये किलो भाव होते. पण सर्वाधिक चढउतार मोगऱ्याच्या भावात होत आहे आवक वर्धा रोड आणि नागपूरलगतच्या ४० कि़मी. क्षेत्रातून होते. सिंचनाच्या सोईसुविधा झाल्यामुळे मोगऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.शहरात लग्नाची संख्या पाहता मोगऱ्याच्या दरात दर तासाला चढउतार होत आहे. सीताबर्डी येथील महात्मा फुले पुष्प बाजारात बुधवारी मोगरा ४०० ते ६०० रुपये किलो, गुरुवारी घट होऊन २०० ते ३०० रुपये आणि शुक्रवारी पुन्हा वाढ होऊन भाव ४०० रुपयांवर दर स्थिरावले होते. शेतकऱ्यांकडून आवक कमीजास्त असल्याचा भावावर परिणाम होत आहे. मोगऱ्यासोबत निशिगंधा फुलाला मागणी आहे. बुधवारी भाव ७० ते ८० रुपये किलो, गुरुवारी १५० ते २५० रुपये आणि शुक्रवारी १५० रुपयांवर स्थिरावले होते. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन जमत नसल्यामुळे उत्पादन कमी आहे. शेतकरी बाजारात दरदिवशी कमीजास्त आवक असल्यामुळे भावातही चढउतार होत असल्याचे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय