शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पंतप्रधान आवास योजनेच्या नावाने हप्ता वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 20:17 IST

पंतप्रधान आवास योजनेनुसार मिळालेल्या शासकीय घरात राहण्यासाठी गुंडाच्या मदतीने गरीब महिलेकडून पिस्तुलच्या धाकावर हप्ता वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देकुख्यात बंटी ठवरेचे कृत्य : सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान आवास योजनेनुसार मिळालेल्या शासकीय घरात राहण्यासाठी गुंडाच्या मदतीने गरीब महिलेकडून पिस्तुलच्या धाकावर हप्ता वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात दक्षिण नागपुरातील कुख्यात गुंड बंटी ठवरे, त्याचे साथीदार आकाश गुंडलवार आणि बादल सहारे यांचा हात असून घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले आहेत.भांडे प्लॉट येथील रहिवासी बंटी ठवरे याची परिसरात दहशत आहे. त्याच्या विरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दंगा घडविण्यासह २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापुर्वी पर्यंत तो जुगार अड्डा चालवून हप्ता वसुली करीत होता. नंदा रमेश वानखेडे (५०) या मजुरी करतात. त्यांचा पती रिक्षा चालवितो. एकाच वस्तीतील असल्यामुळे बंटी नंदाच्या मुलाला ओळखत होता. तो नंदाच्या मुलाला आपल्या सोबत राहण्यास सांगत होता. बंटीचे कारनामे माहीत असल्यामुळे नंदाने आपल्या मुलाला बंटीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे बंटीला राग आला होता. तो बुधवारी रात्री १२.३० वाजता नंदाच्या घरी पोहोचला. नंदा आपल्या कुटुंबासह घरात झोपल्या होत्या. बंटी आणि त्याच्या साथीदारांनी नंदाला आवाज दिला. परंतु संभाव्य धोका लक्षात आल्यामुळे नंदाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आरोपींना राग आला आणि ते दरवाजा तोडून नंदाच्या घरात शिरले. बंटी आणि त्याच्या साथीदारांनी नंदाला शिवीगाळ करणे सुरु केले. तिला घरात राहण्याच्या मोबदल्यात दर महिन्याला ५ हजार रुपये देण्यास सांगितले. नंदाने या घटनेची तक्रार सक्करदरा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तिन्ही आरोपी फरार झाले. जुगार अड्ड्याच्या वादात काही दिवसांपूर्वीच भांडे प्लॉट चौकात प्रतिस्पर्धी गुन्हेगारांनी बंटीवर हल्ला केला होता. पोलिसांनी बंटीच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बंटी सक्रिय झाला होता. दरम्यान पोलिसांचा बेजबाबदारपणा समोर आल्यामुळे सक्करदराच्या ठाणेदाराची बदली करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेला पोलिसांनी गंभीरपणे घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी