शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण अभियानात राज्यात नागपूर १३ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 20:11 IST

महिला व बाल कल्याण विभागाने पोषण अभियानात केलेल्या कामांचे रेटिंग काढले असता, नागपूर १३ व्या स्थानावर राहिले तर अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावला.

ठळक मुद्देअमरावतीने पटकावला प्रथम क्रमांक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बालक, किशोरी मुली आणि महिलांच्या रक्ताक्षयाचे प्रमाण कमी व्हावे, शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची निकोप वाढ व्हावी म्हणून राज्यात संपूर्ण सप्टेंबर महिना पोषण अभियान माह म्हणून राबविण्यात आला. या महिन्याभरात सूक्ष्म पोषण व आरोग्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले. यात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. महिला व बाल कल्याण विभागाने पोषण अभियानात केलेल्या कामांचे रेटिंग काढले असता, नागपूर १३ व्या स्थानावर राहिले तर अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावला.एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत संपूर्ण सप्टेंबर महिन्याभर पोषण महिना घोषित करून या संपूर्ण महिन्यात पोषण आहार विषयी जनजागृती करून लोकचळवळीचे स्वरुप देण्याकरीता २०१८ पासून अभियान राबविण्यात येत आहे. गेल्यावषी नागपूर जिल्हा २० व्या क्रमांकावर होता. या अभियानात ० ते ६ वयोगटातील बालकांमधील खुजे, बुटकेपणाचे तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, १५ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुली, महिला यांच्यामधील रक्ताक्षय कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणारे बालकांचे प्रमाण कमी करणे हे चार उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानात बालके, किशोरी, माता, स्तनदा माता, गरोधर महिला तसेच ग्रामस्थ यांच्याकरीता ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि आरोग्य विभागाद्वारे जागर करण्यात आला. ज्यात पोषण विषयक चित्रफित दाखविण्यात आली. प्रभातफेरी, बालकांचे स्क्रिनिंग, आरोग्य केंद्रावर कार्यशाळा, औषधे वाटप, स्तनपान व शिशुपोषण बाबत गृहभेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. किशोरींना मार्गदर्शन, बेटी बचाव बेटी पढाव तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनांचे प्रचार आणि प्रसिद्धी, कुपोषण दिवस साजरा करणे, ग्राम आरोग्य व स्वच्छता पोषण दिवस आदीच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात आली.या संपूर्ण अभियाना जिल्हा परिषदेचे कृषी, समाजकल्याण, पंचायत, शिक्षण, स्वच्छता व पाणी पुरवठा या विभागांचाही समावेश होता. पोषण अभियानाच्या उपक्रमात नोडल एजन्सी म्हणून महिला व बाल कल्याण विभागाने काम केले.

टॅग्स :nagpurनागपूरAmravatiअमरावती